बलुच नेत्यांना भारतीय नागरिकत्व मिळण्याची शक्यता
By admin | Published: September 16, 2016 03:33 PM2016-09-16T15:33:18+5:302016-09-16T15:33:18+5:30
स्वित्झर्लंडमध्ये आसरा घेतलेल्या बलुच नेत्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात येण्याची शक्यता आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - स्वित्झर्लंडमध्ये आसरा घेतलेल्या बलुच नेत्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात येण्याची शक्यता आहे. पाकिस्तानला चांगल्या मिरच्या झोंबतील असा हा निर्णय असून मोदी सरकार त्या दिशेने काम करत असल्याचे वृत्त जिओ न्यूजने दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उघडपणे बलुचींचा प्रश्न जगासमोर मांडला आणि जगाने त्याची दखल घ्यावी असे आवाहन केले. भारताच्या इतिहासात प्रथमच अधिकृतपणे भारताने पाकिस्तानच्या विरोधात बलुचिस्तानचा प्रश्न उघड केला असून, बलुची नेत्यांनी त्याचे जाहीर स्वागतही केले.
दरम्यान, ब्राहमदाह बुगती, शेर मोहम्मद बुगती आणि अझिझुल्लाह बुगती या बलुचिस्तानमधल्या व आता स्वित्झर्लंडच्या आश्रयाला असलेल्या नेत्यांना भारतीय नागरिकत्व देण्याच्या हालचाली सुरू आहेत. विशेष म्हणजे, बलुची नेत्यांची ही जुनी मागणी असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्ही पाकिस्तानविरोधात बलुचिस्तानसाठी भारतीय कागदपत्रांच्या आधारे मोर्चेबांधणी करू अशी त्यांची भूमिका आहे. बलुचिस्तान रिपब्लिकन पार्टीचे हे नेते असून पाकिस्तानने हा पक्ष बेकायदेशीर ठरवला आहे.
आम्ही नरेंद्र मोदींचे आभारी असून त्यांना आमचा पाठिंबा आहे, यामध्ये कुणाला काय वाटायचे ते वाटू अशी स्पष्टोक्ती एका बलुची नेत्यांनी केली आहे.