सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचेच आॅपरेशन होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 06:42 AM2019-02-05T06:42:58+5:302019-02-05T06:43:15+5:30

फिर एक बार, मोदी सरकार’ अशी घोषणा देत देशाची सत्ता हस्तगत करण्याचे मनसुबे भारतीय जनता पार्टी रचत आहे. त्यासाठी भाजपाच्या मदतीला दक्षिण भारतातून येणारे एकमेव राज्य म्हणजे कर्नाटक आहे.

The possibility of the BJP being in the general elections | सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचेच आॅपरेशन होण्याची शक्यता

सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचेच आॅपरेशन होण्याची शक्यता

Next

- वसंत भोसले

फिर एक बार, मोदी सरकार’ अशी घोषणा देत देशाची सत्ता हस्तगत करण्याचे मनसुबे भारतीय जनता पार्टी रचत आहे. त्यासाठी भाजपाच्या मदतीला दक्षिण भारतातून येणारे एकमेव राज्य म्हणजे कर्नाटक आहे. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकांतील पराभवाने अस्वस्थ झालेल्या भाजापने राज्यातील सत्तारूढ काँग्रेस-जनता दल आघाडीचे सरकार पाडण्यासाठी ‘आॅपरेशन कमळ ’ राबवून पाहिले. त्यात यश न आल्याने येत्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचेच आॅपरेशन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक नऊ जागा जिंकून देणारे कर्नाटक हे देशातील एकमेव होते. भाजपाने अठ्ठावीसपैकी सतरा जागा जिंकून वर्चस्व ठेवले होते, तर कर्नाटकातील तिसरी राजकीय शक्ती म्हणून आपली निर्णायक भूमिका बजावणाऱ्या जनता दलाने दोन जागा जिंकल्या होत्या. त्यामध्ये स्वत: माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा समावेश आहे.

कर्नाटक राज्य विधानसभेची निवडणूक गेल्या वर्षी झाली. त्यात काँग्रेसला बहुमत मिळविता आले नाही. भाजपाला बहुमत मिळविण्यास हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या जागा कमी पडल्या. जनता दलाने अठ्ठावीस जागा जिंकून किंगमेकरची भूमिका बजावली. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने जनता दलालाच मुख्यमंत्रीपद बहाल केले. त्यामुळे राज्यात आज काँग्रेस-जनता दल आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने आघाडीचे सरकार पाडण्यासाठी वारंवार ‘आॅपरेशन कमळ’ योजना राबविली; पण मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या कुशल राजकीय डावपेचांमुळे ते शक्य झाले नाही. भाजपाला बहुमत मिळविता आले नाही, तसेच ते शाबीतही करता आले नाही. परिणामी काँग्रेस-जनता दल आघाडीला अपयशी ठरविण्याचा खटाटोप चालू ठेवला आहे. मात्र,सध्या तरी काँग्रेस आघाडीचा वरचष्मा राहणार असे वातावरण दिसत आहे. त्याचा लाभ उठविण्यासाठी अंतर्गत हेवेदावे बाजूला ठेवले तर कर्नाटक जिंकणे काँग्रेस-जनता दल आघाडीला शक्य आहे.

दक्षिण कर्नाटकातील जागावाटपाची डोकेदुखी
काँग्रेस - जनता दल आघाडीने लोकसभा निवडणुका एकत्रित लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फटका भाजपला बसेल. मात्र जनता दलाचा प्रभाव असणाºया दक्षिण कर्नाटकातील १५ जागांचे वाटप करणेही डोकेदुखी ठरणार आहे. गेल्या निवडणुकीत जनता दल, भाजपा व काँग्रेस अशी तिरंगी लढत झाली होती. दक्षिण कर्नाटकातील आठच मतदारसंघांत जनता दलाची निर्णायक ताकद आहे आणि भाजपा येथेच कमकुवत आहे.

उत्तर कर्नाटकातील लढती काँग्रेस व भाजपा यांच्यातच होतील. कोकण किनारपट्टीतही तिन्ही जागांमध्ये याच पक्षांत लढत आहे. काँग्रेस-जनता दल आघाडीने एकसंधपणे लढत दिली तर दक्षिण भारतातून भाजपाला आशादायी ठरू शकणाºया कर्नाटकात फटका बसू शकतो. काँग्रेसने जनता दलाशी दगाफटका केला तर मात्र भाजपाचे पुन्हा वर्चस्व निर्माण होऊ शकते. काठावरच्या बहुमताने आघाडी सरकार टिकविण्याची जनता दलाची प्राथमिकता असल्याने भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न राहील.

येडियुरप्पांना नाही केंद्रात रस

कर्नाटकात भाजपचे नेतृत्व करणारे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांना केंद्र सरकारच्या राजकारणात रस नाही. त्यांना केंद्रीय मंत्रिपद बहाल केले असतानाही त्यांनी न स्वीकारता राज्यात राहणे पसंत केले होते. त्यामुळे कर्नाटकात ते ‘फिर एक बार, मोदी सरकार’ यासाठी कितपत ताकदीने उतरतील, याची शंका आहे.

याउलट कर्नाटकातील सत्तांतर करण्यातच त्यांची शक्ती खर्ची पडत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘आॅपरेशन कमळ ’ यशस्वी केल्यास, काँग्रेस-जनता दल आघाडी अधिक एकरूप होऊन त्वेषाने निवडणुकीत उतरू शकेल. तसेच वातावरण सध्या असल्याने राज्यात भाजपापुढे मोठे आव्हान आहे. देशाच्या राजकारणात महत्त्वाची भागीदारी करण्यासाठी दोन्ही बाजंूनी राजकारण निर्णायक ठरणार आहे.

Web Title: The possibility of the BJP being in the general elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.