ओडिशा, पूर्वोत्तरमध्ये जोरदार पावसाची शक्यता

By Admin | Published: May 30, 2017 01:20 AM2017-05-30T01:20:25+5:302017-05-30T01:20:25+5:30

पारदीपपासून अंदाजे ६१० कि.मी. अंतरावर असलेल्या दक्षिण पूर्व भागात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ ‘मोरा’ आल्याने आगामी

The possibility of heavy rains in Odisha, Northeast | ओडिशा, पूर्वोत्तरमध्ये जोरदार पावसाची शक्यता

ओडिशा, पूर्वोत्तरमध्ये जोरदार पावसाची शक्यता

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पारदीपपासून अंदाजे ६१० कि.मी. अंतरावर असलेल्या दक्षिण पूर्व भागात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ ‘मोरा’ आल्याने आगामी २४ तासांत ओडिशासह पूर्वोत्तर भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हवामान विभागाच्या कार्यालयाने सांगितले की, चक्रीवादळ ‘मोरा’ पूर्व मध्य बंगालच्या उपसागराकडून उत्तर-उत्तर पूर्व दिशेला गेले. सोमवारी सकाळी हे चक्रीवादळ पारादीपपासून ६१० कि.मी. अंतरावर दक्षिण-पूर्वमध्ये केंद्रित झाले. आगामी १२ तासांत हे चक्रीवादळ गंभीर चक्रीवादळात रूपांतरित होईल आणि उत्तर-उत्तरपूर्व दिशेकडे जाईल, तसेच मंगळवारी सकाळी बांगलादेशचा किनारा पार करील, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
यामुळे आगामी २४ तासांत ओडिशा व राज्याच्या अंतर्गत भागांत गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली
आहे.
दक्षिण-पश्चिम मान्सून आणि केरळातील मान्सूनसाठी परिस्थिती अनुकूल आहे, असे सांगून हवामान खात्याने स्पष्ट केले आहे की, ओडिशातील पारादीप आणि गोपाळपूर बंदरांवर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. केरळ, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार, मध्यप्रदेशच्या पूर्व भागात आणि पूर्वोत्तरच्या काही राज्यांत गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
  

Web Title: The possibility of heavy rains in Odisha, Northeast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.