प्रजासत्ताक दिनी घातपाताची शक्यता; एकास अटक, दोघांचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 11:58 PM2018-01-08T23:58:48+5:302018-01-08T23:59:16+5:30
प्रजासत्ताक दिनी राजपथावर व दिल्लीतील अक्षरधाम मंदिरावर 26 जानेवारीला राजधानी नवी दिल्लीमध्ये आखण्यात आलेला हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट पोलिसांनी उधळून लावला असून, याप्रकरणी मथुरा रेल्वे स्थानकावर भोपाळ शताब्दी ट्रेनमधून एकाला अटक केली आहे.
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी राजपथावर व दिल्लीतील अक्षरधाम मंदिरावर 26 जानेवारीला राजधानी नवी दिल्लीमध्ये आखण्यात आलेला हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट पोलिसांनी उधळून लावला असून, याप्रकरणी मथुरा रेल्वे स्थानकावर भोपाळ शताब्दी ट्रेनमधून एकाला अटक केली आहे. त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.
त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दिल्लीतील एका हॉटेलवर छापा मारला. मात्र त्याआधीच दोन्ही साथीदार पळून गेले. या घटनेमुळे दिल्ली व उत्तर प्रदेशासह उत्तरेकडील सात राज्यांत हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणा सध्या त्यांचा शोध घेण्यात गुंतल्या आहेत.
काश्मीरमध्येही हिजबुल मुजाहिद्दिनने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सहभागी होऊ नका, असे आवाहन केले आहे. निवडणुकांत भाग घेणाºयांच्या चेहºयावर अॅसिड फेकण्यात येईल, अशी धमकीही या संघटनेने नागरिकांना दिली आहे.
पीएचडीचा विद्यार्थी अतिरेकी
अलिगड : अलिगढ मुस्लीम विद्यापीठात पीएचडी करणारा मन्नान वणी या विद्यार्थ्याचे एके ४७ रायफलसह छायाचित्र प्रसिद्ध झाल्यामुळे खळबळ माजली आहे. तो हिजबुल मुजाहिद्दिनमध्ये सहभागी झाल्याचे कळते. त्यामुळे त्याच्या घरची मंडळीही अस्वस्थ झाली आहेत. तो ४ डिसेंबर रोजी काश्मीरमधील पोहोचणार होता. तो घरी न आल्याने कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रारही केली होती. पण नंतर त्याचे एक४७ रायफलीसह छायाचित्र प्रसिद्ध झाले.
दोन अतिरेकी ठार
श्रीनगर : बडगाम येथे पोलीस पथकावर हल्ला करणाºया २ दहशतवाद्यांना पोलिसांनी ठार केले आहे.