निवडणूक स्पेशल रेल्वे धावण्याची शक्यता

By admin | Published: March 17, 2016 03:32 AM2016-03-17T03:32:00+5:302016-03-17T03:32:00+5:30

सण-उत्सवाच्या धर्तीवर निवडणुकीसाठीही विशेष रेल्वेगाड्या सुरूकरण्याची शक्यता सरकारने फेटाळलेली नाही. रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी बुधवारी एका उपप्रश्नाच्या उत्तरात

The possibility of running the special railway in the election | निवडणूक स्पेशल रेल्वे धावण्याची शक्यता

निवडणूक स्पेशल रेल्वे धावण्याची शक्यता

Next

नवी दिल्ली : सण-उत्सवाच्या धर्तीवर निवडणुकीसाठीही विशेष रेल्वेगाड्या सुरूकरण्याची शक्यता सरकारने फेटाळलेली नाही.
रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी बुधवारी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, निवडणूक काळात विशेष गाड्या सुरूकरण्याचा मागणीनुसार विचार केला जाईल. यासंदर्भात सदस्यांच्या सूचना आम्ही लक्षात ठेवू. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या विविध भागांत लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात अशा विशेष गाड्यांची व्यवस्था करण्याची मागणी पुढे आली आहे. नोकरी-व्यवसायासाठी दुसऱ्या गावात जाणाऱ्या लोकांना मतदानासाठी वेळेवर पोहोचता यावे यासाठी जादा गाड्या हव्यात, असे म्हणणे आहे. या राज्यातील अनेक लोक इतरत्र काम करीत असले तरी आपला मतदारसंघ बदलण्यास इच्छुक नसतात.

खाद्यपदार्थांबद्दल ५,००० तक्रारी
लांब पल्ल्याच्या आणि प्रीमियम रेल्वेगाड्यांमध्ये गेल्या वर्षात खाद्यपदार्थांबद्दल सुमारे ४,९६९ तक्रारी नोंदविण्यात आल्या, असेही ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

यापैकी एका तक्रारीवरून परवाना रद्द करण्यासोबतच सक्त ताकीद व इतर कारवाई करण्यात आली.
रेल्वे राज्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, २०१५ सालच्या तक्रारींपैकी १,२०३ प्रकरणांत इशारा देण्यात आला आहे. २,३२१ प्रकरणांमध्ये दंड ठोठाविण्यात आला, तर एकाचा परवाना रद्द करण्यात आला. अन्नाचा दर्जा सातत्याने सुधारत असल्याचे प्रवाशांच्या प्रतिक्रियांवरून स्पष्ट झाले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. (वृत्तसंस्था)

Web Title: The possibility of running the special railway in the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.