यावर्षी दमदार पावसाची अपेक्षा दोन दिवसात पावसाची शक्यता : पेरणीसाठी घाई न करण्याचा सल्ला
By Admin | Published: June 19, 2016 12:16 AM2016-06-19T00:16:58+5:302016-06-19T00:16:58+5:30
जळगाव : गेल्यावर्षी दमदार पावसाअभावी सर्वांची निराशा झाली. वार्षिक सरासरी पर्जन्यमानापेक्षा तब्बल ३५ टक्के पर्जन्यमान कमी झाल्याने जिल्ह्यात टंचाईची स्थिती निर्माण होऊन नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. यावर्षी दमदार पाऊस होईल अशी अपेक्षा बळीराजासह सर्वांना आहे. येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असली तरी पेरणीसाठी घाई करू नये असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
ज गाव : गेल्यावर्षी दमदार पावसाअभावी सर्वांची निराशा झाली. वार्षिक सरासरी पर्जन्यमानापेक्षा तब्बल ३५ टक्के पर्जन्यमान कमी झाल्याने जिल्ह्यात टंचाईची स्थिती निर्माण होऊन नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. यावर्षी दमदार पाऊस होईल अशी अपेक्षा बळीराजासह सर्वांना आहे. येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असली तरी पेरणीसाठी घाई करू नये असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.सरासरी पर्जन्यमान ६६३.३ मिमीजळगाव जिल्ाचे सरासरी पर्जन्यमान हे ६६३.३ मिमी इतके आहे. तर एकूण वार्षिक सरासरी पर्जन्यमान हे ९९४९.४ इतके आहे. पाचोर्याचे पर्जन्यमान हे ७४३.४ मिमी तर जामनेरचे ७२१.५ इतके आहे. या तालुक्यात ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत या तालुक्यांमध्ये अनुक्रमे ४०८.९७ व ३९३.७७ इतका पाऊस झाला आहे.कमी पावसामुळे १२९५ गावांना दुष्काळी फटकासलग दोन वर्ष कमी पाऊस झाल्याने जिल्ात भीषण टंचाई निर्माण झाली. जिल्ातील १२९५ गावांची पैसेवारी ही ५० पैशांच्या आत आली आहे. त्यात जळगाव तालुक्यातील ९२, जामनेर १५२, एरंडोल ६५, धरणगाव ८९, भुसावळ ५४, यावल १०, रावेर १९, मुक्ताईनगर ८१, बोदवड ५१, पाचोरा १२८, चाळीसगाव १३६, भडगाव ६३, अमळनेर १५४, पारोळा ११४, चोपडा ८७ गावांना फटका बसला आहे. या वर्षभरात टँकरची संख्या ही ८० पर्यंत पोहचली होती.यंदा चांगल्या पावसाची अपेक्षासलग दोन वर्ष कमी पाऊस झाल्यामुळे त्रस्त झालेल्या सर्वांना यंदा चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. यावर्षी ७ जुनपासून पाऊस सुरु होईल अशी शक्यता हवामान विभागाने सुरुवातीला वर्तविली होती. मात्र १८ जुनपर्यंत पावसाचे आगमन लांबले आहे. हवामान विभागाने १९ जुनपासून चांगल्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. १९ रोजी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. तर २०, २१ व २२ या तीन दिवसात दमदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. २४, २५,२७ व २८ जून रोजी विजाच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविली आहे.जुलैमध्ये दमदार पावसाची शक्यताजुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी काहीसे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचा संपूर्ण आठवडा हा कमीअधीक प्रमाणात विजांच्या कडकडाटासह पाऊस राहणार असल्याची शक्यता ॲक्युवेदर या हवामानविषयक वेबसाईटने वर्तविली आहे.