श्रीनगर हायवेवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता, रेड अलर्ट केला जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 11:05 AM2019-04-14T11:05:03+5:302019-04-14T11:05:55+5:30

जम्मू-श्रीनगर हायवेवर मोटारसायकलवरुन हल्ला करण्याची गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण हायवे परिसरता रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

The possibility of terrorist attacks on Srinagar highway, red alert issued | श्रीनगर हायवेवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता, रेड अलर्ट केला जारी

श्रीनगर हायवेवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता, रेड अलर्ट केला जारी

googlenewsNext

श्रीनगर - जम्मू-श्रीनगर हायवेवर मोटारसायकलवरुन हल्ला करण्याची गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण हायवे परिसरता रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रविवारी सकाळी सात ते आठच्या दरम्यान दहशतवादी जम्मू-श्रीनगर हायवेवर बॉम्ब ब्लास्ट करणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी सकाळी 9 च्या आधीपासून या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. तसेच सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक पोलीस प्रशासन यांनी तपासणीचे आदेश दिले आहेत. 

जोपर्यंत गुप्तचर यंत्रणेकडून कोणताही पुढील आदेश येत नाही तोवर महामार्गावरील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. मोटारसायकल हायवेवर येणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे. रविवार असल्याकारणाने सुरक्षा यंत्रणांकडून हायवेवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. श्रीनगरच्या बटवारा परिसर हा अतिसंवेदनशील असल्याने याठिकाणी बॉम्बब्लास्ट केला जाऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र या परिसराशिवाय दहशतवादी हायवेवर कुठेही दहशतवादी कृत्य करु शकतो. यासाठी सुरक्षा यंत्रणा तैनात आहेत. 

गेल्या दोन महिन्यांमध्ये हायवेवर दोनवेळा सुरक्षा यंत्रणांच्या ताफ्याला दहशतवाद्यांनी टार्गेट केलं आहे. पुलवामा हल्ल्यांमध्येही दहशतवाद्यांकडून सीआरपीएफच्या ताफ्याला टार्गेट करण्यात आलं होतं. पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा बनिहालजवळ सीआरपीएफच्या ताफ्यावर कारने टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र त्या हल्ल्यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. कारमध्ये झालेल्या बॉम्बब्लास्टमध्ये सीआरपीएफच्या बसचं नुकसान झालं होतं.  

काही दिवसांपूर्वी संयुक्त अरब अमीरातने (यूएई) दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद'चा दहशतवादी निसार अहमद तांत्रे याला काही दिवसांपूर्वी भारताकडे सोपवले होतं. तांत्रे याने चौकशीदरम्यान पुलवामा हल्ल्याबाबत खळबळजनक माहिती दिली होती. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या कटाची आपल्याला माहिती होती असे त्याने म्हटलं होतं  निसार अहमद तांत्रे याची सध्या राष्ट्रीय तपास पथकाकडून (एनआयए) चौकशी करण्यात येत आहे. 'जैश' च्या आदेशानुसारच पुलवामाचा हल्ला झाला होता. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांना मिळालेली माहिती चौकशीतून समोर येत असल्याचं समजतंय. 
 

Web Title: The possibility of terrorist attacks on Srinagar highway, red alert issued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.