सीमा न ओलांडताही शत्रूवर हल्ला शक्य
By admin | Published: September 23, 2016 11:12 AM2016-09-23T11:12:58+5:302016-09-23T11:12:58+5:30
भारतावर नुकताच पाकिस्तानने केलेला हल्ला हे पाकिस्तानने पुकारलेले अघोषित युद्ध प्रकारात मोडते. या हल्ल्याच्या संदर्भात भारतीय लष्कराकडून कोणतीही चूक झाली असे म्हणता येणार नाही.
Next
style="text-align: justify;">- लेफ्टनंट जनरल (निवृत्त ) डी.बी. शेकटकर
भारतावर नुकताच पाकिस्तानने केलेला हल्ला हे पाकिस्तानने पुकारलेले अघोषित युद्ध प्रकारात मोडते. त्यामुळे या हल्ल्याच्या संदर्भात भारतीय लष्कराकडून कोणतीही चूक झाली असे म्हणता येणार नाही. काश्मिरच्या ज्या भागात आता युद्ध झाले येथील उरीचे भौगोलिक क्षेत्रही भारतासाठी अतिशय जोखमीचे आहे. याठिकाणी असणा-या डोंगराळ भागावर पाकिस्तानचे सैन्य असते तर या डोंगरांच्या मधल्या भागात भारताचे सैन्य असते. त्यामुळे त्यांची कोणतीही चाल ही भारतासाठी कायमच धोक्याची असते. तसेच हा सर्व प्रदेश जंगलभाग असल्याने या भागातील परिस्थिती आणखी जोखमीची असते.
आता झालेला हल्ला हा अतिशय नियोजनपूर्व करण्यात आला असून अशाप्रकारचे भ्याड हल्ले करण्यात पाकिस्तान कायमच आघाडीवर राहीलेले आहे. आता घडलेल्या घटनेमध्ये भारताची चूक आहे असे म्हणता येणार नसले तरीही अशाप्रकारचे हल्ले घडू नयेत यासाठी आपण काळजी घ्यायला हवी. अशाप्रकारे शत्रूकडून झालेल्या हल्ल्यात भारताचे इतके जवान शहीद होणे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. पहाटेच्या झोपेच्या वेळेत आपले सैन्य आगीच्या भक्षस्थानी सापडणे ही अतिशय वाईट घटना आहे.
आणखी वाचा
मात्र येत्या काळात पाकिस्तान ज्याप्रमाणे अघोषित युद्ध पुकारते त्याचप्रमाणे भारतालाही काही पाऊले उचलावी लागतील. त्यामुळे फाईट अ टेररीस्ट लाईक अ टेररीस्ट या तत्वानूसार भारताला येत्या काळात आपले धोरण बनवावे लागेल. त्यामुळे त्यांच्याच पद्धतीने आपल्याला आपल्याही नितीमध्ये येत्या काळात बदल करावा लागेल. ते ज्याप्रमाणे आपल्या भागात आक्रमण करतात त्याप्रमाणे आपण त्यांच्या भागात का आक्रमण करु शकत नाही या प्रश्नाचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. यामध्ये सीमा न ओलांडताही सैन्याच्या वस्त्यांवर हल्ले करता येणे शक्य आहे.
याशिवाय भारतातील स्थानिकांना पैसे देऊन त्यांच्याकडून सैन्य आपल्या फायद्याची अनेक कामे करुन घेते. अशाप्रकारचा प्रयत्न शत्रूला लक्ष्य करण्यासाठी भारतही करु शकतो, मात्र आपल्याकडून त्यादृष्टीने कोणताही प्रयत्न केला जात नाही. आपल्याकडील प्रगत तंत्रज्ञान आणि उपलब्ध शस्त्रसाठा हा अतिशय उच्च दर्जाचा असून त्याचा तितक्या चाणाक्ष पद्धतीने वापर केला जात नाही. त्यामुळे या सर्व बाबतीत भारतानेही पाकिस्तानप्रमाणे काही धोरणे निश्चित करायला हवीत.
पाकिस्तानचे भारताबरोबर घोषित युद्ध पुकारण्याचे धाडस नसल्याने ते अशाप्रकारचे हल्ले करत आहेत. मात्र येत्या काळात शत्रूच्या शक्तीबरोबरच त्याच्या कमतरता ओळखून चाल करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सैन्याकडे असलेल्या क्षमतांबरोबरच येत्या काळात अतिशय चाणाक्ष पद्धतीने पुढील पाऊले उचलणे हे भारतीय सैन्यापुढील आव्हान असेल.
शब्दांकन - सायली जोशी पटवर्धन