पाकिस्तानात पोस्टर लावून लष्करने स्वीकारली उरी हल्ल्याची जबाबदारी
By admin | Published: October 25, 2016 01:21 PM2016-10-25T13:21:03+5:302016-10-25T13:44:53+5:30
उरी येथे भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या हल्ल्यामागे पाक पुरस्कृत दहशतवादी संघटना असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
गुजरनवाला, दि. २५ - उरी येथे भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या हल्ल्यामागे पाक पुरस्कृत दहशतवादी संघटना असल्याचे स्पष्ट झाले आहे. उरी येथे ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यातील एका दहशतवाद्यासाठी लष्कर-ए-तोएबा विशेष नमाज पठण करणार आहे तसे पोस्टर पाकिस्तानातील गुजरनवाला भागात लावण्यात आल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
हे पोस्टर्स म्हणजे उरी दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचा एक सबळ पुरावा आहे. पाकिस्तानने आतापर्यंत उरी हल्ल्यासंदर्भातील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. उरीच्या एका हल्लेखोराचे नाव मोहम्मद अनस उर्फ अबू सिराका असे आहे. तो गुजरनवालाचा रहिवासी होता.
या पोस्टरवर लष्कर-ए-तोएबाच्या या दहशतवाद्यासाठी विशेष नमज पठण ठेवण्यात आले असून त्यात स्थानिक नागरीकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. अबू सिराकाने १७७ हिंदू सैनिकांचा खात्मा केला असे खोटा प्रचार या पोस्टरमधून करण्यात येत आहे. लष्कर-ए-तोएबाचा प्रमुख हाफीझ सईदचा फोटोही या पोस्टरवर आहे. गुजरनवाला पंजाब प्रांतात आहे. बडा नुल्लाह गिरजाख येथे हे नमाजपठण होणार आहे.