शास्त्रीय संगीतातील आठ दिग्गजांवर टपाल तिकिटे
By admin | Published: September 4, 2014 01:18 AM2014-09-04T01:18:10+5:302014-09-04T01:18:10+5:30
भारतरन्न पं. भीमसेन जोशी यांच्यासह आठ दिग्गज गायक-वादक कलाकारांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी भारतीय टपाल खात्याने त्यांच्यावर विशेष टपाल तिकिटे काढली
Next
नवी दिल्ली : असामान्य प्रतिभा आणि उत्तुंग कर्तृत्वाने भारतीय शास्त्रीय संगीताच्या समकालीन कालखंडावर स्वत:चा अमीट ठसा उमटविणा:या भारतरन्न पं. भीमसेन जोशी यांच्यासह आठ दिग्गज गायक-वादक कलाकारांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी भारतीय टपाल खात्याने त्यांच्यावर विशेष टपाल तिकिटे काढली असून या तिकिटांच्या संचाचे अनावरण राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते बुधवारी झाले.
राष्ट्रपती भवनात झालेल्या या विशेष कार्यक्रमास दळवळणमंत्री रवी शंकर प्रसाद व टपाल विभागाच्या सचिव कावेरी बॅनर्जी उपस्थित होत्या. शास्त्रीय संगीत क्षेत्रतील ज्या दिग्गज कलाकारांवर ही तिकिटे काढली गेली आहेत त्यांत पं. भीमसेन जोशी, पं. रवीशंकर, पं. मल्लिकाजरुन मन्सूर, पं. कुमार गंधर्व, उस्ताद विलायत अली खान, उस्ताद अली अकबर खान आणि विदुषी डी. के. पट्टामल व गंगूबाई हनगळ यांचा समावेश आहे.
राष्ट्रपती म्हणाले की, भारताची सांस्कृतिक परंपरा समृद्ध करण्यात या महान कलाकारांनी दिलेल्या योगदानाची मोजदाद करणो अशक्य आहे. आता हे कलाकार या टपाल तिकिटांच्या रूपाने जगभर पोहोचतील व भारतीय शास्त्रीय संगीताच्या सुवर्णकाळाच्या स्मृती चिरंतन ठेवतील. ते म्हणाले, भारतीय शास्त्रीय संगीताचा उगम वेदांमधून झाला व ती एक दैवी देणगी (नादब्रrा) आहे, असे मानले जाते. म्हणूनच विकास आणि जागतिकीकरणाच्या भोवती फिरणा:या आजच्या भारतीय समाजजीवनात हा अमूल्य सांस्कृतिक ठेवा जपणो महत्त्वाचे आहे.
राष्ट्रपती भवनात नव्याने सुरु झालेल्या वस्तुसंग्रहालयात टपाल तिकिटांचा हा संच कायमस्वरूपी प्रदर्शित केला जाईल व येत्या सप्ताहापासून अभ्यागतांना तो पाहता येईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
खा. विजय दर्डा यांचा आग्रह
4आपापल्या क्षेत्रत उत्तुंग कर्तृत्वाचा नवा मापदंड प्रस्थापित करणा:या पं. भीमसेन जोशी, सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या असामान्य व्यक्तींचे टपाल तिकीट काढण्याबाबत राज्यसभा सदस्य खा. विजय दर्डा यांनी वेगळ्य़ा दृष्टिकोनातून आग्रह धरला होता. संबंधित व्यक्तीच्या निधनाला 1क् वर्षे उलटल्याखेरीज तिचे टपाल तिकीट न काढण्याचा नियम खात्याकडून पुढे केला जात होता.
4तथापि, हा नियम निर्थक असल्याची भूमिका खा. दर्डा यांनी घेतली. पं. भीमसेन जोशी यांच्यासारख्या कलावंताबद्दल जनमनातील आस्था कायम असतानाच्या काळातच हा नियम बाजूला ठेवून टपाल तिकीट काढले पाहिजे, किंबहुना हे कोण होते, अशी अनभिज्ञता समाजात येईर्पयत त्यासाठी वेळ काढता कामा नये, असा आग्रह खा. दर्डा यांनी धरला होता. परिणामी निधनाला चार वर्षे होण्याच्या आत पं. भीमसेन जोशींचे टपाल तिकीट जारी झाले आहे.