काश्मीरमध्ये तब्बल ७० दिवसांनंतर खणाणले मोबाईल, पोस्टपेड सेवेवरील निर्बंध मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 12:37 PM2019-10-14T12:37:32+5:302019-10-14T12:41:56+5:30

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवल्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये सरकारने खोऱ्यातील सर्व प्रकारच्या मोबाईल सेवा बंद केल्या होत्या.

Postpaid mobile services restored in the Jammu and Kashmir | काश्मीरमध्ये तब्बल ७० दिवसांनंतर खणाणले मोबाईल, पोस्टपेड सेवेवरील निर्बंध मागे

काश्मीरमध्ये तब्बल ७० दिवसांनंतर खणाणले मोबाईल, पोस्टपेड सेवेवरील निर्बंध मागे

Next

श्रीनगर - तब्बल ७० दिवसांच्या खंडानंतर आजपासून काश्मीरमध्ये पुन्हा एकदा मोबाइल फोन खणाणू लागले आहेत. पोस्टपेड मोबाईल सेवेवरील निर्बंध हटवण्यात आल्यानंतर सोमवारी दुपारपासून खोऱ्यातील सुमारे ४० लाख हून अधिक फोन सुरू झाले आहेत. वास्तविक काश्मीर खोऱ्यामधील मोबाईल सेवा शनिवारीच पूर्ववत करण्यात येणार होती. मात्र शेवटच्या क्षणी निर्माण झालेल्या तांत्रिक अडथळ्यांमुळे हा निर्णय लांबणीवर टाकावा लागला होता.  



काश्मीरमधील राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी पोस्टपेड सेवेवरील निर्बंध हटवण्याची घोषणा केली होती, त्यानंतर आजपासून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र असे असले तरी काश्मीरमधील रहिवाशांना मोबाइल इंटरनेटसाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. तसेच प्रीपेड मोबाईल सेवा सुरू करण्याबाबतचा निर्णयही मागाहून होणार आहे. 

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवल्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये सरकारने खोऱ्यातील सर्व प्रकारच्या मोबाईल सेवा बंद केल्या होत्या. मोबाईल सेवा बंद असल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील सत्तर लाख नागरिकांना गैरसोय सोसावी लागत होती. तसेच या निर्णयामुळे राज्य प्रशासनावर टीकाही होत होती. 

कलम ३७० हटवल्यानंतर  काश्मीर खोऱ्यातीलच मोबाईल सेवा बंद करण्यात आली होती होती. जम्मू आणि लडाख या भागात मोबाईल सेवा सुरू होती.  दरम्यान, काश्मीर खोरे पर्यटकांसाठी खुले करण्याचे निर्देश केंद्र सरकारने नुकतेच दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासनाने पोस्टपेड मोबाईल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  

Web Title: Postpaid mobile services restored in the Jammu and Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.