JEE Advanced 2021: 3 जुलैला होणारी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा लांबणीवर; कोरोनामुळे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 09:16 PM2021-05-26T21:16:19+5:302021-05-26T21:17:31+5:30

JEE Advanced 2021 postponed: जेईई मेन परीक्षा पुढे ढकलल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. एप्रिल-मे मध्ये होणारी ही परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

postponed JEE Advanced 2021: JEE Advanced 2021 postponed due to coronaVirus | JEE Advanced 2021: 3 जुलैला होणारी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा लांबणीवर; कोरोनामुळे निर्णय

JEE Advanced 2021: 3 जुलैला होणारी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा लांबणीवर; कोरोनामुळे निर्णय

googlenewsNext

JEE Advanced 2021 postponed: जॉईंट एन्ट्रन्स एक्झाम (JEE) अ‍ॅडव्हान्स 2021 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. आयआयटी खरगपूरने जेईई अ‍ॅडव्हान्स 2021 परीक्षा स्थगित केली आहे. कोरोना व्हायरसचा प्रकोप लक्षात घेऊन आयआयटीने ही परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. JEE Advanced 2021 परीक्षा 3 जुलै, 2021 ला घेण्यात येणार होती. (JEE Advanced 2021 postponed due to Covid-19 surge)


जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा सध्यातरी पुढील सूचना मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची तारीख योग्य वेळी केली जाणार आहे. उमेदवार जेईई अ‍ॅडव्हान्सची अधिकृत साईट jeeadv.ac.in वर जाऊन अधिकृत नोटीस पाहू शकतात. नोटिफिकेशनची डायरेक्ट लिंक खाली देण्यात आली आहे. 
जेईई मेन परीक्षा 2021 पास होणारे विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स परिक्षेसाठी पात्र ठरतात. दरवर्षी जवळपास 2.5 लाख टॉपर जेईई मेनपास होऊन अ‍ॅडव्हान्ससाठी अर्ज करतात. प्रत्येक विभागातील रँक आणि मार्क पाहता ही संख्या थोडी अधिक असू शकते.


जेईई मेन परीक्षा कारण...
जेईई मेन परीक्षा पुढे ढकलल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. एप्रिल-मे मध्ये होणारी ही परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनाचे संकट पाहता नॅशनल टेस्टिंग एजन्सी सध्या एन्ट्रन्स एक्झाम आयोजित करण्यास उत्सुक नाहीय. यामध्ये नीट-यूजी 2021 देखील आहे. या सर्व परीक्षा ऑगस्टमध्ये घेतल्या जाण्याची शक्यता आहे. 


नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)कडून जेईई मेन मे सत्राची परीक्षा (JEE Main 2021 May Postponed) पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. कोरोनाचा कहर पाहायला मिळत असल्याने जेईई मेन 2021 एप्रिल सत्राची परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती. त्यानंतर आता जेईई मेन परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर केली जाईल, अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली आहे. 

Web Title: postponed JEE Advanced 2021: JEE Advanced 2021 postponed due to coronaVirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा