काँग्रेसच्याच राजवटीत गरिबी वाढली; मोदींचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 01:08 PM2022-12-02T13:08:45+5:302022-12-02T13:09:06+5:30
गरिबांना बॅंक खातेही उघडता आले नसल्याची केली टीका
बोदेली : ‘गरिबी हटाओ’ असा नारा पूर्वीच्या काँग्रेस सरकारने दिला होता; परंतु त्यांच्याच राजवटीत गरिबी वाढली. काँग्रेसने केवळ घोषणा दिल्या आणि ठोस काहीही केले नाही. देशाची दिशाभूल केली, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येथील सभेत केली. विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात ५ डिसेंबर रोजी येथे मतदान होणार आहे. ते म्हणाले की, मागील
काँग्रेस आघाडी सरकारच्या धोरणांमुळे गरीब नागरिक अर्थव्यवस्थेत सक्रिय भूमिका
बजावू शकले नाहीत. काँग्रेसच्या काळात बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले असले तरी गरिबांना बँक खाते उघडता आले नाही.
३० किलोमीटरचा ‘रोड शो’
मोदी यांनी गुरुवारी अहमदाबाद शहरात ३० किलोमीटरचा ‘रोड शो’ केला. मोदींचा हा रोड शो अहमदाबादच्या पूर्व विभागातील नरोडा गाम भागातून दुपारी सुरू झाला आणि संध्याकाळी पश्चिम विभागातील चांदखेडा भागातील आयओसी सर्कल येथे तो समाप्त झाला.
जनता परिवर्तनासाठी एकजूट : खरगे
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होताच राज्याच्या प्रगतिशील भविष्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन केले. गुजरातमधील सात कोटी जनतेत परिवर्तनासाठी एकजूट हाेत असल्याचेही खरगे म्हणाले.