खादीमध्ये कोट्यावधी लोकांना रोजगार देण्याचे सामर्थ्य - पंतप्रधान मोदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2016 01:56 PM2016-01-31T13:56:59+5:302016-01-31T13:57:35+5:30
भारताचे स्वातंत्र्य आणि सभ्यता खादीमध्ये आहे' असे सरदार वल्लभभाई पटेल म्हणाले होते. कोट्यावधी नागरिकांना रोजगार देण्याचे सामर्थ्य खादीत आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - ' भारताचे स्वातंत्र्य आणि सभ्यता खादीमध्ये आहे' असे सरदार वल्लभभाई पटेल यांनी सांगितले होते. सध्याच्या तरूणांमध्ये खादीचे आकर्षण खूप वाढले असून कोट्यावधी नागरिकांना रोजगार देण्याचे सामर्थ्य या खादीत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले. नवीन वर्षात मोदींनी पहिल्यांदाच देशवासियांसी 'मन की बात'द्वारे त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य करत त्यांनी विविध उपक्रम व सुरू असलेल्या कामांविषयी माहिती दिली.
' सध्या खादीच्या माध्यमातून १८ लाख रोजगार निर्मिती झाली आहे. यामध्ये कोट्यवधींना रोजगार देण्याची क्षमता आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्याकडे एक खादीचा जोड ठेवला पाहिजे' असे ते म्हणाले.
दरम्यान आता देशवासियांना ' मन की बात ' कधीही ऐकता येणार. मोबाईवरून 8190881908 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर मन की बात कुठेही व केव्हाही ऐकता येऊ शकेल, असे मोदींनी नमूद केले. ५० टक्के शेतकऱ्यांना पिकविमा योजनेत आणण्याचा सरकारचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मोदींच्या 'मन की बात' मधील महत्वाचे मुद्दे :
- देशासाठी प्राणांची आहुती देणा-यांना श्रद्धांजली वाहणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. दरवर्षी ३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सव्वाशे कोटी भारतीयांनी २ मिनिटांसाठी मौन पाळावे.
- भारताचे स्वातंत्र्य आणि सभ्यता हे खादीत आहे, असे सरदार पटेल यांनी म्हटले आहे. तरूण पिढीसाठीही खादी आकर्षण बनत आहे.
- २६ जानेवारी रोजी हरियाण, गुजरातमध्ये एक अनोखा प्रयोग दिसला. गावातील सर्वात शिक्षित मुलीला ध्वजवंदन करण्याचा मान देण्यात आला. या कृतीततून 'बेटी बचाव- बेटी पढाओ'चा एक उत्तम संदेश या कृतीतून देण्यात आला.
- आता 8190881908 या नंबरवर मिस्ड कॉल देऊन 'मन की बात' कधीही ऐकता येणे शक्य.
- ५० टक्के शेतकऱ्यांना पिक विमा योजनेत आणण्याचा सरकारचा विचार आहे.
- आंध्र प्रदेशमधील विशाखा पट्टणम येथील समुद्र किनाऱ्यावर इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू होत आहे. जगातील प्रमुख देशांची लढाऊ जहाजं व युद्धनौका या इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यूमध्ये सहभागी होणार आहे. भारताने ही मोहीम आयोजित केल्याचा अभिमान वाटतो.