विजेअभावी मनपातील यंत्रणा दोन तास ठप्प लिफ्ट बंद: आयुक्त, उपायुक्त चौथ्या मजल्यावर
By admin | Published: April 19, 2016 12:48 AM2016-04-19T00:48:59+5:302016-04-19T00:48:59+5:30
जळगाव : महापालिकेच्या १७ मजली इमातीत सकाळी ११ वाजेच्या दरम्यान वीज पुरवठा यंत्रणा बंद पडल्याने सर्व लिफ्ट जागच्या जागी थांबून काही जण त्यात अडकले होते. काही वेळात त्यांची कशीबशी सुटका झाली मात्र दुपारी १.१५ पर्यंत ही यंत्रणा बंदच होती. कर्मचारी व नागरिक येण्याच्या वेळेतच वीज पुरवठा बंद झाल्याने अनेकांना कसरत करत वरच्या मजल्यांवर जावे लागले. तर आयुक्त व उपायुक्तांनी चौथ्या मजल्यावरच बसून कामकाज केले.
Next
ज गाव : महापालिकेच्या १७ मजली इमातीत सकाळी ११ वाजेच्या दरम्यान वीज पुरवठा यंत्रणा बंद पडल्याने सर्व लिफ्ट जागच्या जागी थांबून काही जण त्यात अडकले होते. काही वेळात त्यांची कशीबशी सुटका झाली मात्र दुपारी १.१५ पर्यंत ही यंत्रणा बंदच होती. कर्मचारी व नागरिक येण्याच्या वेळेतच वीज पुरवठा बंद झाल्याने अनेकांना कसरत करत वरच्या मजल्यांवर जावे लागले. तर आयुक्त व उपायुक्तांनी चौथ्या मजल्यावरच बसून कामकाज केले. महापालिकेतील लिफ्ट अचानक बंद पडण्याचे प्रकार वारंवार होत असतात. सहा पैकी जेमतेम चार लिफ्ट सुरू असतात. बर्याच वेळेस कर्मचारी नसल्यानेही लिफ्ट बंद असतात. सोमवार आठवड्याचा पहिला दिवस. त्यामुळे कर्मचारी व अधिकारी ११ वाजेच्या दरम्यान कार्यालयात आले तर विजेअभावी ही यंत्रणा बंद पडली होती. अचानक झाला आवाज१७ मजलीतील वीज यंत्रणेत अचानक बिघाड होऊन मोठा आवाज झाला व वीज पुरवठा बंद झाला होता. त्यातच मोठे जनरेटरही सुरू न झाल्याने लिफ्ट आहे त्या ठिकाणी थांबल्या होत्या. कर्मचार्यांनी कसरत करत वेगवेगळ्या मजल्यावर लिफ्ट उभ्या करून आतील कर्मचारी व नागरिकांची सुटका केली. मात्र नंतर अन्य कर्मचार्यांना पायर्यांचा आधार घेऊन वर जावे लागले. सध्या घरपीत सूट दिली जात असल्याने अनेक नागरिक नवीन वर्षाची घरपी भरण्यासाठी मनपात आले होते त्यांना कसरत करत वरच्या मजल्यांवर जावे लागले. विविध विभागांमध्येही पंखे बंद झाल्याने कर्मचार्यांना तेथे बसणेही कठीण जात होते.