उरणमध्ये झाले शक्तिप्रदर्शन

By admin | Published: September 26, 2014 11:29 PM2014-09-26T23:29:54+5:302014-09-26T23:29:54+5:30

उरणमध्ये आज काँग्रेसच्यावतीने महेंद्र घरत यांनी, तर शिवसेनेच्यावतीने मनोहर भोईर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

Power Performance in Uran | उरणमध्ये झाले शक्तिप्रदर्शन

उरणमध्ये झाले शक्तिप्रदर्शन

Next

चिरनेर : उरणमध्ये आज काँग्रेसच्यावतीने महेंद्र घरत यांनी, तर शिवसेनेच्यावतीने मनोहर भोईर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. या निमित्ताने दोन्ही पक्षांनी शक्तिप्रदर्शन करीत आपली ताकद दाखवली.
उरण विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने शुक्रवारपासून प्रचाराला सुरुवात झाली आहे. सर्वात पहिला उमेदवारी अर्ज उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी भरला आहे, तर गुरुवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची रांगच लागली आहे. यामध्ये आज महेंद्र घरत यांनी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरताना जोरदार शक्तिप्रदर्शन केले. कोटनाक्यापासून सुरू झालेल्या रॅलीचे पहिले टोक राजपाल नाक्यावर होते, तर शेवटचे टोक राघोबादेव मंदिरापर्यंत होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते रॅलीत सहभागी झालेले दिसून येत होते, मात्र काँग्रेसकडे तिकिट मागितलेला दुसरा एकही काँग्रेसचा नेता यावेळी उपस्थित नव्हता. दरम्यान, मनोहरशेठ भोईर यांनीही शिवसेनेच्यावतीने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनीही राघोबादेव मंदिरापासून ते तहसील कार्यालयापर्यंत भलीमोठी रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. (वार्ताहर)

Web Title: Power Performance in Uran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.