विद्युत प्रकल्पाने शेतकर्‍यांची फसवणूक आश्वासन पाळले नाही : लागवडीचे क्षेत्र पाण्याखाली

By admin | Published: July 8, 2015 09:55 PM2015-07-08T21:55:20+5:302015-07-08T21:55:20+5:30

विद्युत प्रकल्पाने शेतकर्‍यांची फसवणूक

Power Project has not favored farmers' cheating: watering cultivation areas | विद्युत प्रकल्पाने शेतकर्‍यांची फसवणूक आश्वासन पाळले नाही : लागवडीचे क्षेत्र पाण्याखाली

विद्युत प्रकल्पाने शेतकर्‍यांची फसवणूक आश्वासन पाळले नाही : लागवडीचे क्षेत्र पाण्याखाली

Next
द्युत प्रकल्पाने शेतकर्‍यांची फसवणूक
आश्वासन पाळले नाही : लागवडीचे क्षेत्र पाण्याखाली
आसनगाव : शहापूर तालुक्यातील भातसा नदीवर कासगावजवळ उभारण्यात येत असलेल्या सह्याद्री रिन्युएबल एनर्जी प्रा.लि. या कंपनीच्या २५ मेगावॅट क्षमतेच्या अपारंपरिक जलविद्युत प्रकल्पामुळे खरिवली गावातील शेतकर्‍यांच्या लागवडीचे क्षेत्र तसेच ग्रामपंचायतीच्या शासकीय पाणीपुरवठा योजनेचा जलकुंभ पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रकल्प सुरू करताना शेतकर्‍यांना संरक्षक भिंत बांधून देण्याचे आश्वासन न पाळल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.
या प्रकल्पात मौजे सापगाव, कासगाव, खरिवली, अर्जुनली येथील अनेक शेतकर्‍यांच्या शेतजमिनी या प्रकल्पासाठी हस्तांतरित केल्या होत्या. त्या वेळेस प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना मोबदला व संरक्षक भिंत बांधून देत नाही, तोपर्यंत तो सुरू करण्याची परवानगी देऊ नये, असा पत्रव्यवहार अधीक्षक अभियंत्यांकडे कार्यकारी अभियंत्यांनी केला होता.
* जनहिताचे प्रकल्प होण्यास आमच्या शेतकरी बांधवांची काहीही हरकत नाही. परंतु, सदर प्रकल्पांत भूमिपुत्रांना नोकरी, जमिनीचा मोबदला, सुरक्षिततेची मागणी यांना प्रथम प्राधान्य द्यावे. - शिवाजी अधिकारी, ग्रामस्थ
* कंपनीने ग्रामस्थांसोबत केलेल्या करारानुसार जनसंरक्षणासाठी भिंत बांधून पुराच्या पाण्यापासून शेतकर्‍यांना वाचवावे व दिलेला शब्द पाळावा. - कुसुम नारायण सासे, पोलीस पाटील

Web Title: Power Project has not favored farmers' cheating: watering cultivation areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.