सर्वसामान्यांना फटका! महागाईसोबतच आता विजेचाही 'झटका'; वाढणार बिल, जाणून घ्या, किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 10:06 AM2022-07-22T10:06:51+5:302022-07-22T10:49:01+5:30

देशात उष्णता वाढल्याने विजेचा वापरही विक्रमी पातळीवर पोहोचला होता. यावर्षी देशात 60 लाखांहून अधिक एसी विकले गेले आहेत, तर 9 जून रोजी देशभरात सर्वाधिक 211 GW विजेचा वापर झाला आहे.

power tarrif hike india to import over 7 crore tonn coal how it will impact you | सर्वसामान्यांना फटका! महागाईसोबतच आता विजेचाही 'झटका'; वाढणार बिल, जाणून घ्या, किती?

सर्वसामान्यांना फटका! महागाईसोबतच आता विजेचाही 'झटका'; वाढणार बिल, जाणून घ्या, किती?

Next

नवी दिल्ली - देशात महागाई वाढत असताना आता विजेचा 'शॉक' बसू शकतो. गरमीमुळे वाढलेली विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार 7.6 कोटी टन कोळसा आयात करण्याच्या तयारीत आहे. देशातील वीज केंद्रांजवळील खाणींमधून कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे आणि मागणीनुसार वीजनिर्मिती होत नाही. पावसामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कोळसा उत्पादनावर आणखी परिणाम होणार असल्याचं मानलं जात आहे. अशा परिस्थितीत मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारी कंपनी कोल इंडिया लिमिटेड (CIL) सुमारे 1.5 कोटी टन कोळसा आयात करणार आहे.

एनटीपीसी आणि दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन (DVC) ही देशातील सर्वात मोठी वीज निर्मिती कंपनी देखील सुमारे 2.3 कोटी टन कोळसा आयात करण्याची योजना आखत आहे. यासोबतच इतर सरकारी आणि खासगी वीजनिर्मिती कंपन्याही त्यांचा वापर पूर्ण करण्यासाठी 3.8 कोटी टन कोळसा आयात करू शकतात. अशाप्रकारे, 2022 मध्येच देशात सुमारे 7.6 कोटी टन कोळसा आयात केला जाईल, जो जागतिक बाजाराच्या दरानुसार केला जाणार आहे.

80 पैसे प्रति युनिट पर्यंत वाढेल बिल 

कोळसा आयात करणार म्हणजे वीजनिर्मिती आता महाग होणार आहे. साहजिकच वीज निर्मिती कंपन्या हा वाढलेला खर्च ग्राहकांकडून वसूल करतील आणि त्यांच्या बिलाचं ओझ वाढेल. येत्या काही दिवसांत विजेच्या प्रति युनिट दरात 50 ते 80 पैशांनी वाढ होईल, असा अंदाज आहे. या प्रकरणाशी निगडित दोन सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, बंदरापासून वीज केंद्र किती अंतरावर आहे यावर प्रति युनिट किमतीत वाढ अवलंबून असेल. म्हणजे बंदरांपासून स्थानकापर्यंत कोळसा नेण्याच्या खर्चामुळेही कंपन्यांच्या खर्चात भर पडणार आहे.

या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, देशात उष्णता वाढल्याने विजेचा वापरही विक्रमी पातळीवर पोहोचला होता. यावर्षी देशात 60 लाखांहून अधिक एसी विकले गेले आहेत, तर 9 जून रोजी देशभरात सर्वाधिक 211 GW विजेचा वापर झाला आहे. मान्सूनबरोबर तो कमी झाला असला तरी 20 जुलै रोजी कमाल वापर 185.65 GW होता. सध्या कंपन्यांना विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी दररोज 21 लाख टन कोळशाची गरज भासते. मान्सूनमुळे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमधील कोळसा उत्पादनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे कंपन्यांना त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी आयातीचा मार्ग अवलंबावा लागतो.

15 ऑगस्टनंतर कोळशाचा तुटवडा सुरू होईल, असे कंपन्यांचे म्हणणे आहे, मात्र आयातीतून त्याची भरपाई होईल, अशी अपेक्षा आहे. याशिवाय 15 ऑक्टोबरनंतर परिस्थिती अधिक अनुकूल होईल, कारण त्यानंतर विजेचा वापर कमी होईल आणि पावसाळा संपल्यानंतर कोळशाचे उत्पादनही वाढू शकेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: power tarrif hike india to import over 7 crore tonn coal how it will impact you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज