शक्तिमान मारहाण प्रकरण : भाजप आमदार गणेश जोशींना जामीन
By admin | Published: March 22, 2016 07:36 PM2016-03-22T19:36:43+5:302016-03-22T19:40:36+5:30
उत्तराखंड पोलिसांजवळ असलेल्या शक्तिमान या घोड्याला मारहाण करणारे भाजपचे आमदार गणेश जोशी यांचा जामीन मंजूर करण्यात आला. जिल्हा आणि
Next
>ऑनलाइन लोकमत
डेहराडून, दि. २२ - उत्तराखंड पोलिसांजवळ असलेल्या शक्तिमान या घोड्याला मारहाण करणारे भाजपचे आमदार गणेश जोशी यांचा जामीन मंजूर करण्यात आला. जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश रामदत्त पालीवाल यांनी आमदार गणेश जोशी यांचा २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला असल्याची माहिती आमदार गणेश जोशी यांचे वकिल आर. एस. राघव यांनी दिली.
आमदार जोशी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या सरकारविरोधात आंदोलन करीत असताना पोलिसांजवळ असलेल्या शक्तिमान नावाच्या घोड्याला काठीने जबर मारहाण केली होती. त्यामध्ये शक्तिमानच्या पायाला मोठी दुखापत झाली. त्याचा पाय कापून कृत्रिम पाय बसवावा लागला.
शक्तिमानला मारहाण केल्याप्रकरणी आमदार जोशी यांना अटक करण्यात आली होती. तसेच, १९ मार्च रोजी न्यायालयाने आमदार जोशी यांचा जामीन अर्ज नाकारला होता. त्यानंतर आज त्यांचा २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.