दमानिया यांच्यावर अबु्रनुकसानीचा दावा ठोकणार प्रभाकर पवार : खडसे यांच्या बदनामीची सुपारी घेतल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2016 06:13 PM2016-06-02T18:13:26+5:302016-06-02T18:13:26+5:30
जळगाव: अंजली दमानिया यांना जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर अबु्रनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा जळगाव बाजार समितीचे सभापती प्रकाश नारखेडे व संचालक प्रभाकर पवार यांनी दिला आहे. दमानिया यांनी खडसेंच्या बदनामीची सुपारीच घेतल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला. संचालक मनोहर पाटील यावेळी उपस्थित होते.
Next
ज गाव: अंजली दमानिया यांना जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर अबु्रनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा जळगाव बाजार समितीचे सभापती प्रकाश नारखेडे व संचालक प्रभाकर पवार यांनी दिला आहे. दमानिया यांनी खडसेंच्या बदनामीची सुपारीच घेतल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला. संचालक मनोहर पाटील यावेळी उपस्थित होते.दमानिया यांनी दोन दिवसापूर्वी जळगाव बाजार समितीत ४५० रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप मुंबईत केला होता. बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न तीन कोटी ८२ लाख रुपये आहे, तसेच गेल्या सहा वर्षापासून एकही बांधकाम झालेले नाही.त्यामुळे त्यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे हे आरोप केले आहेत. खडसे यांचे भाऊ हरीश खडसे यांना ७० टक्के कामे देण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे, मुळात हरीश हे खडसे यांचे भाऊ नाहीत तर पुतणे आहेत. दमानिया यांना भ्रष्टाचाराच्याच कारणावरून आपने काढले, तेच आता भ्रष्टाचारावर बोलायला लागले आहेत. बाजार समितीती शिवसेना व भाजपची सत्ता आहे, त्या जिल्ात कोणासोबत फिरल्या हे सार्या जिल्ाने पाहिले, त्यामुळे दमानिया यांचा बोलावता धनीच त्यांना चुकीची माहिती पुरवत असल्याचे पवार म्हणाले. जनाधार नसलेल्या व्यक्तीवर किती विश्वास ठेवायचा. दरम्यान, महसूलमंत्री खडसे यांनी बाजार समितीच्या गुरांच्या बाजारासाठी जागतिक बॅँकेकडून एक कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. येत्या काही दिवसात पुणे पणन मंडळाकडून त्याची निविदा काढण्यात येणार आहे.