महिलेच्या ट्विटला ‘प्रभू’ धावले
By admin | Published: November 29, 2015 03:35 AM2015-11-29T03:35:26+5:302015-11-29T03:35:26+5:30
कटकाळात सोशल नेटवर्क साईट्सचा वापर सुरक्षेसाठी किती उत्तम प्रकारे होऊ शकतो; याची प्रचिती एका महिला रेल्वे प्रवाशाला आली. झालेही तसेच, गुरुवारी सायंकाळी धावत्या रेल्वेमध्ये
मुंबई : संकटकाळात सोशल नेटवर्क साईट्सचा वापर सुरक्षेसाठी किती उत्तम प्रकारे होऊ शकतो; याची प्रचिती एका महिला रेल्वे प्रवाशाला आली. झालेही तसेच, गुरुवारी सायंकाळी धावत्या रेल्वेमध्ये एका पुरुष प्रवाशाने गैरवर्तन केल्याचे टष्ट्वीट संकटग्रस्त महिला नम्रता महाजन यांनी केले आणि त्याची दखल थेट केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीच घेतली. त्यानंतर झालेल्या हालचालींमुळे संबधित महिलेला तातडीने मदत मिळाली व तिचा जीव भांड्यात पडला.
नम्रता महाजन गुरुवारी टे्रन नंबर १८०३० ने एकट्याच प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान एका पुरुष रेल्वे प्रवाशाने त्यांना त्रास देण्यात सुरुवात केली. त्या प्रवास करत असलेली रेल्वे शेगाव स्थानकाहून पुढे जात असतानाच हा प्रकार घडत होता. काहीशा घाबरलेल्या नम्रता यांनी ऐन संकटात सोशल नेटवर्क साईट्सची मदत घेतली. आपल्यासोबत घडत असलेल्या प्रकाराची तक्रार त्यांनी थेट टष्ट्वीटरवर केली. तक्रार करताना त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना टष्ट्वीटरवर टॅग केले.
शेगाव रेल्वे स्थानकाहून रेल्वे पुढे सरकत असतानाच सायंकाळी ६ वाजून ५९ मिनिटांच्या सुमारास त्यांनी मंत्र्यांकडे टष्ट्वीटद्वारे तक्रार करत मदत मागितली. एक पुरुष सहप्रवासी आपणाला त्रास देत आहे. मी घाबरले आहे. तरी कृपया टे्रन नंबर १८०३० मध्ये मदत पोहचवा, अशा आशयाचे टष्ट्वीट त्यांनी केले. याचवेळी मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी वेद प्रकाश यांनी हे टष्ट्वीट पाहिले आणि त्यांच्याशी संपर्कही साधला, असे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
वेद प्रकाश यांनी प्रसंगावधान राखत डीआरएम भुसावळशीही संपर्क केला. भुसावळ स्थानक येताच साधारणत: ४० मिनिटांच्या अंतराने एक आरपीएफ जवान रेल्वेमध्ये दाखल झाला आणि संकटात असलेल्या नम्रता महाजन यांना मदत केली. यावेळी प्रतीक्षा यादीवर असलेल्या पुरुष प्रवाशाच्या असभ्य वर्तनामुळे आपण घाबरल्याचे त्यांनी कथन केले. शिवाय संबधित प्रवासी अपशब्द वापरत असल्याचेही त्यांनी तक्रार केली. महत्त्वाचे म्हणजे टष्ट्वीटवरून मदत मागितल्यानंतर काही क्षणात का होईना; आपणाला मदत करण्यात आल्याबद्दल महाजन यांनी रेल्वे मंत्रालयाचे आभारही व्यक्त केले. (प्रतिनिधी)