प्रभू श्रीरामाने मोडले ट्रेंडिंगचे सर्व विक्रम; पाहा गेल्या २४ तासांतील टॉप १० सर्च टॉपिक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 08:33 AM2024-01-23T08:33:57+5:302024-01-23T08:34:33+5:30
इमारती तसेच वाहनांवर राम मंदिराचे भगवे ध्वज लावण्यात आले. अवघा देश राममय झाला होता. असेच चित्र गुगलवरही होते.
नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरात सोमवार, २२ जानेवारी २०२३ रोजी रामलल्लांची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. अवघ्या जगाने हा सोहळा लाइव्ह पाहिला. यानिमित्ताने देशभरातील मंदिरांत आरती करण्यात करण्यात आली. ठिकठिकाणी रामकथांचे आयोजन करण्यात आले. चौकाचौकात प्रभू रामांचे भव्य कटआउट लावण्यात आले. इमारती तसेच वाहनांवर राम मंदिराचे भगवे ध्वज लावण्यात आले. अवघा देश राममय झाला होता. असेच चित्र गुगलवरही होते.
मागील २४ तासांपासून गुगलवर राम मंदिराशी निगडित गोष्टी मोठ्या प्रमाणावर सर्च करण्यात आल्या आहेत. टॉप १० सर्चमध्ये केवळ राम मंदिराशी संबंधित गोष्टी होत्या. याआधी असे कधीही घडलेले नाही. प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने गुगलवर राम मंदिराशी संबंधित इतक्या मोठ्या प्रमाणात सर्च पहिल्यांदाच करण्यात आले.
गेल्या २४ तासांतील टॉप १० सर्च टॉपिक
राम . अयोध्या. हिंदू मंदिर
तनकपूर . राम . आरती
राम . भारतीय जनता पार्टी . अयोध्या . नरेंद्र मोदी
राम . अयोध्या . रामनाम . हिंदू टेम्पल . प्राणप्रतिष्ठा
अरुणाचल प्रदेश . अयोध्या. हिंदू टेम्पल . राम . इंडिया . चीफ मिनिस्टर
अयोध्या . कल्याणसिंग . बाबरी मशीद पाडण्यात आली . राम . उत्तर प्रदेश . चीफ मिनिस्टर. १९९२ . हिंदू टेम्पल . भारतीय जनता पार्टी . डायरेक्टर जनरल ऑफ पोलिस
इंडियन नॅशनल काँग्रेस . राम . हिंदू टेम्पल . अयोध्या . आचार्य प्रमोद कृष्णन . नरेंद्र मोदी . प्राणप्रतिष्ठा . इंडिया
राम . अयोध्या. डिग्निटी ऑफ लाइफ
राम . अयोध्या. डिग्निटी ऑफ लाइफ
शोभा करंदालजे . अयोध्या . राम . इंडियन नॅशनल काँग्रेस . भारतीय जनता पार्टी