लाभले आम्हास ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 06:44 AM2024-01-23T06:44:17+5:302024-01-23T06:44:57+5:30
प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला बॉलीवूडसह दक्षिणेतील अनेक दिग्गज कलाकार, उद्योगपती, क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटींची उपस्थिती होती.
अयोध्या : प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला बॉलीवूडसह दक्षिणेतील अनेक दिग्गज कलाकार, उद्योगपती, क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटींची उपस्थिती होती. या सोहळ्याला उपस्थित राहून आम्हाला भरून पावल्यासारखे झाले. या ऐतिहासिक क्षणाला आम्हाला बोलावले, आम्ही भाग्यवान आहोत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
अशा समारंभाला उपस्थित राहणे एक सन्मान आहे. आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला असा सोहळा पाहायला मिळाला.
- हेमा मालिनी, भाजप खासदार आणि अभिनेत्री
आज मी लाखो काश्मिरी हिंदूंचे प्रतिनिधित्व करत आहे ज्यांना आपली घरे सोडावी लागली. आज प्रभू राम त्यांच्या घरी परतले आहेत. आजचा दिवस भारताच्या इतिहासातील स्वर्णिम आहे. आणि मला आशा आहे की काश्मिरी पंडितही लवकरच काश्मीरला परततील. जगभरात लोक हा दिवस साजरा करत आहेत. संपूर्ण देश आज दिवाळी साजरी करीत आहे. - अनुपम खेर, अभिनेते
राम मंदिर हे भारताचे ऐतिहासिक प्रतीक बनले आहे. यापेक्षा मोठा आनंद कोणता असू शकतो? आज मी खूप आनंदी आहे. आम्ही लहानपणी स्वप्नात पाहायचो आणि अयोध्येबद्दल वाचले व ऐकले आहे. - सुभाष घई, चित्रपट निर्माते
मला रामलल्लांचे आशीर्वाद मिळाले आहेत. मला खूप बरे वाटले की मला बोलावले. जेव्हा जेव्हा मला इन्स्पेक्टरची भूमिका दिली गेली, तेव्हा माझे नाव राम होते. - जॅकी श्रॉफ, अभिनेता
श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणे हा एक अद्भुत अनुभव आहे. हा दिवस संपूर्ण भारतातील लोकांसाठी बनला आहे.
- चिरंजीवी, अभिनेता
रामलल्लांचे रूप सुंदर आहे. शिल्प खूप छान आहे. मला वाटते की भगवान रामांचा खरेच मूर्तीत वास झाला आहे. मी खूप भावुक झालो आणि आशीर्वाद मागितले. - विवेक ओबेरॉय, अभिनेता
हा एक ऐतिहासिक क्षण आहे, मला येथे आमंत्रित केल्याबद्दल खूप खूप आभार. सर्वांनी इथे यावे... - आयुष्मान खुराना, अभिनेता
एखाद्या धार्मिक स्थळी गेल्यावर काय वाटते, तेच मला वाटते. आम्हा सर्वांना हे खूप दिवसांपासून हवे होते आणि मला वाटते की या मोठ्याप्रसंगी येथे येणे खूप आनंददायी आहे. - मिताली राज, माजी क्रिकेटपटू
मन प्रसन्न झाले… मी गेली ६३ वर्षे भजने गातोय आणि आता आणखी गाणार आहे. - अनुप जलोटा, गायक
राममंदिर उत्कृष्ट सुंदर आहे. ते पाहणे प्रत्येकासाठी सन्मानाची गोष्ट आहे. - रामचरण, अभिनेता
शब्दांनी भावना व्यक्त करता येत नाहीत. आजच्या सोहळ्यानंतर मला वाटते की देश एका वेगळ्याच परिमाणात आहे.- शैलेश लोढा, अभिनेता