आजपासून दिल्लीत प्रबोधन अभियान
By Admin | Published: July 20, 2016 05:30 AM2016-07-20T05:30:03+5:302016-07-20T05:30:03+5:30
२0 जुलै ते २0 आॅगस्ट दरम्यान अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने ‘हिंसेला नकार आणि मानवतेचा स्वीकार’या राष्ट्रीय प्रबोधन अभियान राबविण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंदराव पानसरे आणि डॉ. कलबुर्गी या तिघांच्या मारेकऱ्यांना शोधण्यात आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ आवाज बुलंद करण्यासाठी दिल्लीत २0 जुलै ते २0 आॅगस्ट दरम्यान अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने ‘हिंसेला नकार आणि मानवतेचा स्वीकार’या राष्ट्रीय प्रबोधन अभियान राबविण्यात येणार आहे.
सनातन संस्था, हिंदु जनजागरण समितीसारख्या संघटनांचा पर्दाफाश करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यात दाभोलकर, पानसरे व कलबुर्गींच्या कुटुंबियांसह अंनिसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध पक्ष, संस्था सहभागी होणार आहेत, असे अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, हमीद दाभोलकर व मीरा पानसरे यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>अभियानाच्या मागण्या?
दाभोलकर, पानसरे, कलबुर्गींचे मारेकरी व या खुनामागचे सूत्रधार लवकरात लवकर पकडले जावेत.
अध्यात्माच्या नावाखाली कट्टरपंथी कार्यक्रम राबवणाऱ्या, हिंसक विचारांचा प्रसार करून खून व बॉम्बस्फोटासारख्या अतिरेकी कारवाया करणाऱ्या संशयित साधकांच्या सनातन संस्था व हिंदु जनजागरण समिती, सनातन प्रभात नियतकालिक व संकेतस्थळांवरही कारवाई करावी.