प्रबोधन संमेलन व मोटारसायकल रॅली सार्वजनिक डॉ.आंबेडकर जयंती उत्सव समिती बैठक
By admin | Published: March 22, 2016 12:39 AM2016-03-22T00:39:34+5:302016-03-22T00:39:34+5:30
जळगाव : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती उत्साहाने व आगळावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यासाठी सार्वजनिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती उत्सव समितीची बैठक मुकुंद सपकाळे यांचे अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत धर्म भारतीय संविधान आणि सहिष्णुता; भारतीय संविधान निर्मितीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान, संसदीय लोकशाहीचे भवितव्य, लोकशाही राष्ट्रवाद इत्यादी विषयावर विचारवंतांची व्याख्याने व परिसंवाद आयोजित करून प्रबोधन करण्याचा कार्यक्रम निित करण्यात आला. तसेच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी-युवा वर्गासाठी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, युवावर्गासोबत बौद्धिक संवाद इ. विषयावर चर्चा करण्यात आली.
Next
ज गाव : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती उत्साहाने व आगळावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यासाठी सार्वजनिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती उत्सव समितीची बैठक मुकुंद सपकाळे यांचे अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत धर्म भारतीय संविधान आणि सहिष्णुता; भारतीय संविधान निर्मितीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान, संसदीय लोकशाहीचे भवितव्य, लोकशाही राष्ट्रवाद इत्यादी विषयावर विचारवंतांची व्याख्याने व परिसंवाद आयोजित करून प्रबोधन करण्याचा कार्यक्रम निित करण्यात आला. तसेच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी-युवा वर्गासाठी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, युवावर्गासोबत बौद्धिक संवाद इ. विषयावर चर्चा करण्यात आली.एक एप्रिल रोजी मोटारसायकल रॅलीसार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे जनजागृतीसाठी १ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता काव्य रत्नावली चौकातून मोटारसायकल रॅलीचे करण्यात आले आहे. रॅली काव्यरत्नावली चौक, तांबापूर मार्गाने नेरीनाका, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जुने जळगाव आंबेडकर नगर, सुभाष चौक मार्गाने टॉवर चौक, शिवाजीनगर, गेंदालाल मिल, दूध फेडरेशन, गुजराल पेट्रोलपंप ते पिंप्राळा हुडको, खंडेराव नगर, हरिविठ्ठल नगर, वाघनगर मार्गाने समतानगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रॅलीचे अभिवादन सभा घेऊन विसर्जन करण्यात येईल, अशी माहिती मुकुंद सपकाळे यांनी प्रसिद्धीला दिली आहे.प्रभाग निहाय बैठकांचे आयोजनडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५वी जयंती शिस्तबद्ध रितीने काढण्यासाठी व बौद्धिक प्रबोधन कार्यक्रम राबवण्यासाठी जळगाव शहरात प्रभाग निहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. २२ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता पिंप्राळा व रात्री ८ वाजता पिंप्राळा हुडको. २३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता सिद्धार्थ नगर व रात्री ८ वा. तांबापूर, २४ मार्च रोजी सायंकाळी ६ वा. हरिविठ्ठलनगर, रात्री ८ वा. वाघनगर, २५ रोजी सायंकाळी ६ वा. सुप्रिम कॉलनी, रात्री ८ वा. अजिंठा हौ. सोसायटी, २६ रोजी सायंकाळी ६ वाजता पंचशील हौसिंग सोसायटी, २७ रोजी सायंकाळी ६ वा. समतानगर व रात्री ८ वा. संभाजीनगर, २८ रोजी सायंकाळी ६ वा. आंबेडकर नगर, रात्री ८ वा. गुरुनानक नगर, २९ मार्च रोजी सायंकाळी ६ वा. गेंदालाल मिल, रात्री ८ वा. शिवाजीनगर हुडको.