व्यवहारात फसवणूक करणार्‍यास जामीन

By admin | Published: March 29, 2016 12:25 AM2016-03-29T00:25:49+5:302016-03-29T00:25:49+5:30

जळगाव : व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्‘ातील संशयित आरोपीस सोमवारी जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला.

Practicing fraud cheating | व्यवहारात फसवणूक करणार्‍यास जामीन

व्यवहारात फसवणूक करणार्‍यास जामीन

Next
गाव : व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्‘ातील संशयित आरोपीस सोमवारी जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला.
सिन्दबाद केदारनाथ यादव (वय १९, रा.संभापाडा, ता.तलासरी, जि.पालघर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. फिर्यादी विठ्ठल सर्जेराव पवार यांची व्यवहारात फसवणूक केल्याने त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. न्यायाधीश के.एस. कुळकर्णी यांनी सिन्दबादला २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड.केतन ढाके यांनी तर आरोपीतर्फे ॲड.एस.सी. पावसे यांनी कामकाज पाहिले.
दोघांना लुटणार्‍यास जामीन
दुचाकीवरून जाणार्‍या दोन जणांना अडवून मारहाण करीत लुटल्याप्रकरणातील संशयित आरोपी किरण कैलास पाटील (वय २५, रा.पाषाणसाई चौक, पुणे) यास सोमवारी न्यायाधीश कुळकर्णी यांनी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात किरणविरुद्ध भादंवि कलम ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड.केतन ढाके यांनी तर आरोपीतर्फे ॲड.एस.सी. पावसे यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Practicing fraud cheating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.