प्रज्ञा - गणेश मल्लिनाथ मंदिरात भजन स्पर्धा

By admin | Published: February 18, 2015 11:53 PM2015-02-18T23:53:58+5:302015-02-18T23:53:58+5:30

सासवड : येथील संत सोपानदेव मंदिराशेजारील श्रीगणेश मल्लिनाथ मंदिरात दि. १४ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी या काळात अखंड हरिनाम सप्ताह व शिवलीलामृत ग्रंथ वाचन, महाशिवरात्रीनिमित्त छोट्या व मोठ्या गटातील भजन स्पर्धा व विविध धार्मिक कार्यक्रम झाले. सासवडकर नागरिकांनी या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद दिला. महाशिवरात्रीनिमित्ताने मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. तसेच, फुलांची आरास केली होती.

Pradnya - Bhajan competition at Ganesh Mallinath temple | प्रज्ञा - गणेश मल्लिनाथ मंदिरात भजन स्पर्धा

प्रज्ञा - गणेश मल्लिनाथ मंदिरात भजन स्पर्धा

Next
सवड : येथील संत सोपानदेव मंदिराशेजारील श्रीगणेश मल्लिनाथ मंदिरात दि. १४ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी या काळात अखंड हरिनाम सप्ताह व शिवलीलामृत ग्रंथ वाचन, महाशिवरात्रीनिमित्त छोट्या व मोठ्या गटातील भजन स्पर्धा व विविध धार्मिक कार्यक्रम झाले. सासवडकर नागरिकांनी या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद दिला. महाशिवरात्रीनिमित्ताने मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. तसेच, फुलांची आरास केली होती.
ग्रामस्थ, सिद्धेश्वर एकतरी मंडळ, हनुमान भजनी मंडळ, श्रीगणेश मल्लिनाथ ग्रुप व शिवशंभो ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम झाले. सप्ताह काळात काकडारती, भजन, शिवलीलामृत ग्रंथ वाचन, हरिपाठ, हरिजागर, महाआरती असे कार्यक्रम झाले. मंगळवारी महाशिवरात्रीनिमित्ताने पहाटे महाभिषेक, सकाळी ९ वाजता महायज्ञ झाला. त्यानंतर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी जिल्हा पातळीवरील भजन स्पर्धा झाल्या. त्यात १३ संघांनी भाग घेतला.
भजन स्पर्धेतील विजयी संघ पुढील प्रमाणे - छोटा गट : प्रथम - साई भजनी मंडळ, पाटस; द्वितीय - श्रीनाथ भजनी मंडळ गोपाळवाडी, दौंड; तृतीय - सरगम भजनी मंडळ, वाठार बुद्रुक; चतुर्थ - संत सोपानकाका भजनी मंडळ, सासवड.
मोठा गट : प्रथम - स्वर साधना, गुरोळी; द्वितीय -हिवरे प्रासादिक भजनी मंडळ; तृतीय - संत सोपानकाका भजनी मंडळ, सासवड; चतुर्थ -विठ्ठल भजनी मंडळ, एखतपूर.
विजयी गटांना बापूमहाराज भिंताडे (भिवडी,) तसेच उद्योजक हरिभाऊ भगत यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. मंडळाच्या वतीने भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. भजन स्पर्धेचे परीक्षक म्हणून भगवान होले, प्रा. तुकाराम मुरकुटे, सदाभाऊ गिरमे यांनी काम पाहिले. सासवड परिसरातील विविध भागांतील शिवभक्त, विद्यमान नगरसेवक, दानशूर मंडळी व मंडळाचे क्रियाशील कार्यकर्ते यांच्या सहयोगातून हा उत्सव पार पडला.

Web Title: Pradnya - Bhajan competition at Ganesh Mallinath temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.