प्रज्ञा - सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून विकासकामे करावीत दत्ता भरणे : पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन
By admin | Published: August 18, 2015 09:37 PM2015-08-18T21:37:03+5:302015-08-18T21:37:03+5:30
नीरा : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरिबांची अडचण लक्षात घेऊन प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब आणि मागासवर्गीयांसाठी नि:स्वार्थीपणे काम केले. त्या कामाची नोंद गोरगरिबांनी घेतल्याने मी जिल्हा परिषद अध्यक्षाचा आमदार झाल्याचे उदाहरण आहे, असे सांगून सर्वसामान्य गरीब माणूस केंद्रबिंदू मानून प्रत्येक पदाधिकार्याने विकासकामे करावीत, असे आवाहन आमदार दत्ता भरणे यांनी केले.
Next
न रा : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरिबांची अडचण लक्षात घेऊन प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब आणि मागासवर्गीयांसाठी नि:स्वार्थीपणे काम केले. त्या कामाची नोंद गोरगरिबांनी घेतल्याने मी जिल्हा परिषद अध्यक्षाचा आमदार झाल्याचे उदाहरण आहे, असे सांगून सर्वसामान्य गरीब माणूस केंद्रबिंदू मानून प्रत्येक पदाधिकार्याने विकासकामे करावीत, असे आवाहन आमदार दत्ता भरणे यांनी केले. पुरंदर तालुक्यातील नीरा येथे नवीन शुद्ध पाणीपुरवठा योजनेच्या आणि बाजारतळ विकासकामाच्या उद्घाटन समारंभप्रसंगी आमदार भरणे बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद होते. या वेळी सोपानकाका बँकेचे अध्यक्ष संजय जगताप, जिल्हा परिषदेच्या सभापती सारिका इंगळे, वंदना धुमाळ, सदस्य विराज काकडे, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, सरपंच राजेश काकडे, सुजाता दगडे, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष चंद्रकांत धायगुडे, विकास आघाडीचे प्रमुख रमणिकलाल कोठाडिया, नाना जोशी, शामराजे कुंभार, नंदुकाका जगताप, प्रदीप पोमण यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नीरा परिसरात कोट्यवधी रुपयांची विविध विकासकामे करण्यात आली आहेत. लवकरच करोडो रुपये खर्चाची सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्राची नवी इमारत उभी केली जात आहे. सर्वसामान्य गरिबांच्या विकासासाठी जिल्हा परिषदेने प्राधान्याने काम केले असून सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका घेऊन प्रामाणिक काम केले असल्याचे नमूद करून समाजाने विकासाची जबाबदारी पेलविणार्या योग्य व्यक्तीला संधी दिली पाहिजे, असे मत पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी बोलताना व्यक्त केले. सरपंच राजेश काकडे यांनी गेल्या पाच वर्षांत ३६ कोटी रुपयांची नीरा शहरात विकासकामे झाल्याचे सांगितले. आजी - माजी मंत्र्यांनी उद्घाटन सोहळा टाळला?तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्राधान्याने नीरावासीयांसाठी सुमारे पाच कोटीची शुद्ध पाणीपुरवठा योजना करण्याचे आदेश दिलेले होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते या पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन करण्यात येणार होते. या समारंभासाठी आमदार दत्तात्रय भरणे, काँग्रेसचे युवानेते संजय जगताप यांच्यासह पुणे जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्यांना निमंत्रित करण्यात आले होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत:च्या राजकीय क्षेत्रातील पदार्पणापासून नीरा शहरातील वैभवामध्ये भर घालणारी कोट्यवधी रुपयांची विविध विकासकामे करण्यासाठी प्रयत्न केले आहेत, तर दुसरीकडे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या पुरंदर - हवेली मतदारसंघातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे असलेले नीरा शहर आहे. परंतु नीरा शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटन सोहळ्याला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांची अनुपस्थिती होती. वास्तविक नीरानगरीच्या नागरिकांचे आवडते नेते असणार्या या दोघा आजी - माजी मंत्र्यांनी उद्घाटन सोहळ्याला येण्याचे का टाळले, याची उलटसुलट चर्चा करीत नीरा ग्रामस्थांनी निराशा व्यक्त केली. ---------------------------------------------------------------------- ०००००