प्रज्ञा - सासवडला २४ वीजचोरांवर कारवाई

By admin | Published: August 20, 2015 10:10 PM2015-08-20T22:10:10+5:302015-08-20T22:10:10+5:30

सासवड : महावितरणच्या सासवड विभागाच्या वतीने नुकतीच वीजचोरीविरोधात धडक मोहीम राबविण्यात आली. सासवड विभागात येणार्‍या पुरंदर व भोर तालुक्यातील २४ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली. यामुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.

Pragya - Saswada's action on 24 power workers | प्रज्ञा - सासवडला २४ वीजचोरांवर कारवाई

प्रज्ञा - सासवडला २४ वीजचोरांवर कारवाई

Next
सवड : महावितरणच्या सासवड विभागाच्या वतीने नुकतीच वीजचोरीविरोधात धडक मोहीम राबविण्यात आली. सासवड विभागात येणार्‍या पुरंदर व भोर तालुक्यातील २४ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली. यामुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.
पुरंदर व भोर या दोन्ही तालुक्यांत अनधिकृत वीजवापर रोखण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. यात वीजचोरी पकडण्यासोबतच नादुरुस्त, सदोष मीटर बदलण्यात आले तसेच ग्राहकांच्या विद्युत संचांची तपासणी करण्यात आली. पुरंदर गावठाण वाहिनी, पांडेश्वर वाहिनी व नीरा शहर वाहिनीवरील ग्राहकांची तपासणी यात करण्यात आली. सासवड उपविभागात सुमारे ४५ तर नीरा उपविभागात सुमारे ३० अधिकारी, कर्मचार्‍यांनी या विशेष मोहिमेत भाग घेतला.
सासवड उपविभागात भिवरी, नारायणपूर, भिवडी, चांबळी भागात तपासणीदरम्यान वीजचोरीची ११ प्रकरणे उघडकीस आली. या ग्राहकांनी ३५ हजार रुपयांची ४ हजार ४१३ युनिट्स वीजचोरी केल्याचे निदर्शनास आले. याच मोहिमेत वीजबिल थकवलेल्या ४५ ग्राहकांवर कारवाई करून त्यांच्याकडून दीड लाख रुपये वसूल करण्यात आले. गावांतील सुमारे ६० ग्राहकांचे सदोष, नादुरुस्त वीजमीटर तातडीने बदलण्यात आले. नीरा उपविभागात वीजचोरीची ८ प्रकरणे आढळून आली. या ग्राहकांनी १ लाख २८ हजार रुपयांच्या १३ हजार ७९ युनिट्सची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले.
भोर उपविभागात रायरेश्वर वाहिनीवरील करंजे, आंबवडे, कारी, रावडी आदी गावांमध्ये ५ ग्राहकांनी ९० हजार रुपयांच्या २० हजार युनिट्सची वीजचोरी केल्याचे उजेडात आले. २ ग्राहकांनी १२ हजार रुपयांच्या २१०० युनिट्सचा अनधिकृत वीजवापर केल्याचे आढळले. या सर्व ग्राहकांना नियमानुसार दंड करण्यात आला आहे.
बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता रामराव मुंडे, बारामती मंडलाचे अधीक्षक अभियंता केशव सदाकळे, सासवड विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता हितेंद्र भिरूड (सासवड), बाळासाहेब फासगे (नीरा), विलास शिर्के (भोर) यांनी अभियंते, कर्मचारी व जनमित्रांच्या सहाय्याने ही मोहीम यशस्वी केली. दोन्ही तालुक्यांत ही मोहीम यापुढेही अशीच राबविण्यात येणार आहे, असे कार्यकारी अभियंता सुनील पावडे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Pragya - Saswada's action on 24 power workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.