शहीद हेमंत करकरेंवर प्रज्ञा ठाकूर यांची पुन्हा टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 06:21 AM2021-06-27T06:21:15+5:302021-06-27T06:21:23+5:30
प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी असाही आरोप केला आहे की, हेमंत करकरे यांनी चौकशीदरम्यान त्यांच्या शिक्षकाचाही छळ केला. प्रज्ञा ठाकूर या मालेगा बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत
भोपाळ : मुंबई हल्ल्यात शहीद झालेले एटीएसचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांच्यावर भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे. खरे देशभक्त करकरे यांना देशभक्त म्हणत नाहीत, असेही त्या म्हणाल्या.
प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी असाही आरोप केला आहे की, हेमंत करकरे यांनी चौकशीदरम्यान त्यांच्या शिक्षकाचाही छळ केला. प्रज्ञा ठाकूर या मालेगा बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत. एका कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या की, २००८ मध्ये आपल्याला एका खोट्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यांनी असाही आरोप केला की, करकरे यांनी चौकशीदरम्यान त्यांच्या शिक्षकांची बोटे मोडली होती. खोटी साक्ष तयार करण्यासाठी हे सर्व केले गेले होते. खरे देशभक्त करकरे यांना देशभक्त म्हणत नाहीत, असेही त्या म्हणाल्या. मुंबईत २००८ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात हेमंत करकरे हे शहीद झाले होते. याआधीही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी करकरे यांच्यावर टीका केलेली आहे.