अमित शहांनी सांगितलं प्रज्ञा सिंहांना उमेदवारी देण्यामागचं कारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 05:41 PM2019-05-17T17:41:10+5:302019-05-17T17:41:43+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत पहिल्यांदा अमित शाह पत्रकार परिषदेला संबोधित करत आहेत.
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत पहिल्यांदाच अमित शाहांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं आहे. पत्रकार परिषदेत साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या उमेदवारीवर अमित शाह म्हणाले, त्यांना उमेदवारी हा काँग्रेसच्या विरोधात आमचा सत्याग्रह आहे. काँग्रेसनं खोटी हिंदू दहशतवादाची संकल्पना आणली. विनाकारण लोकांना त्रास देण्याचं काम केलं. मतांच्या धुव्रीकरणासाठीच काँग्रेसनं असं केलं. काँग्रेसनं असं करून हिंदू संस्कृतीला पूर्णतः बदनाम केलं. काँग्रेसनं खोटी केस बनवल्याप्रकरणी देशाची माफी मागावी, असंही अमित शाह म्हणाले आहेत.
मी काँग्रेस पक्षाला विचारू इच्छितो की, समझोता एक्स्प्रेसमध्ये काही लोकांना पकडण्यात आलं. एक खोटी केस बनवून हिंदू दहशतवादाचं त्याला नाव देण्यात आलं. समझोता एक्स्प्रेसमधील लोकांची निर्दोष मुक्तता झाली असून, त्यांना 5-5 लाखांचा मोबदलाही मिळाला आहे. काँग्रेसनं देशाच्या सुरक्षेबरोबर समझोता केला. त्याबद्दल काँग्रेसनं पूर्ण जगासमोर माफी मागायला हवी, असंही अमित शाह म्हणाले आहेत.
BJP President Amit Shah on Pragya Singh Thakur's statement on Nathuram Godse: Party has served her a show cause notice & asked her to reply within 10 days. After she files a reply, party's disciplinary committee will take appropriate actions pic.twitter.com/vkPRCFAtae
— ANI (@ANI) May 17, 2019
भाजपाचं सरकार पुन्हा बनवण्यासाठी जनतेचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. भाजपा एक संघटनात्मक काम करणारा पक्ष राहिला आहे. संघटन आमच्या सर्वच कामाचं प्रमुख अंग राहिलं आहे. 2014मध्ये जनतेनं ऐतिहासिक जनादेश दिला होता.
BJP President Amit Shah: 80 BJP workers have been killed in one and a half years. What does Mamata Banerjee has to say about this? If we were responsible for this, why violence didn't take place anywhere else? pic.twitter.com/pW8gXOoZOY
— ANI (@ANI) May 17, 2019
पहिल्यांदाच पूर्ण बहुतमानं देशात बिगर काँग्रेस सरकार आलं होतं. मोदी सरकार जनतेच्या सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करेल हे आम्ही तेव्हाच ठरवलं होतं. मोठ्या बहुमतानं पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर येईल. मोदी सरकारनंही प्रत्येक 15 दिवसांनी एक नवी योजना आणून प्रत्येक वर्गाची प्रगती साधण्याचा प्रयत्न केला. मोदी सरकारनं आणलेल्या 133 योजनांचा समाजातल्या प्रत्येक वर्गालालाभ मिळाला. शेवटच्या घटकापर्यंत लाभ मिळाला.
BJP chief Amit Shah: We'll perform good in North-East, very good in West Bengal. We'll do good in Odisha & there will be improvement in number of seats in all the states in the South. We'll improve in Maharashtra also. pic.twitter.com/vkkGHMCMD3
— ANI (@ANI) May 17, 2019
2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आम्ही चांगलं यश मिळवलं. 'नरेंद्र मोदी प्रयोग' देशानं स्वीकारला आहे. देशाच्या विकासात आपलाही सहभाग आहे ही गोरगरीब जनतेची भावना आहे. सव्वाशे कोटी देशवासीयांमध्ये असुरक्षितेतची भावना नाही. या निवडणुकीत विरोधकांकडून महागाई आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा नाही. आम्ही 16 जानेवारीपासून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. आम्हाला चांगले निकाल मिळतील अशी आशा आहे, असंही अमित शाह म्हणाले आहेत.
BJP President Amit Shah: We started our election campaign from January 16...Our target was to win 120 Lok Sabha seats which we couldn't win the last time. We are confident that we'll receive good results pic.twitter.com/P80DRk8Tqz
— ANI (@ANI) May 17, 2019