दुबईत ‘लोकमत’चे कौतुक, महाराष्ट्राचे ब्रँड अॅम्बेसेडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 05:04 AM2017-09-23T05:04:18+5:302017-09-23T05:04:20+5:30
माणूस कितीही दूर असला, तरी आपली माती, नाती आणि माणसांमधील अंतर कधीच दूर होत नाही. याचा सुखद अनुभव लोकमत वृत्तपत्र समूहातील चमूला दुबई भेटीत आला. दुबईत स्थिरावलेल्या मराठीजनांनी ‘लोकमत’चे स्वागत केले आणि छोटेखानी समारंभ आयोजित करून पाठीवर कौतुकाची थाप दिली.
दुबई : माणूस कितीही दूर असला, तरी आपली माती, नाती आणि माणसांमधील अंतर कधीच दूर होत नाही. याचा सुखद अनुभव लोकमत वृत्तपत्र समूहातील चमूला दुबई भेटीत आला. दुबईत स्थिरावलेल्या मराठीजनांनी ‘लोकमत’चे स्वागत केले आणि छोटेखानी समारंभ आयोजित करून पाठीवर कौतुकाची थाप दिली.
दुबईमध्ये स्थिरावलेल्या मराठीजनांनी व्हॅल्यू मॅनेज कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर महेश शुक्ल यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली आहे. ह.भ.प. अॅड. जयवंतराव बोधले महाराज यांच्या माध्यमातून लोकमत चमू आणि दुबईतील मराठीजन एकत्र आले आणि १८ सप्टेंबरच्या सायंकाळी स्नेहसोहळा पार पडला.
लोकमतच्या सोलापूर आवृत्तीचे संपादक राजा माने यांनी दुबईत स्थिरावूनही आपली मराठमोळी संस्कृती जपत, महाराष्टÑ मंडळाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या मराठीजनांचे या वेळी कौतुक केले. ही सर्व कर्तबगार मंडळी खºया अर्थाने महाराष्ट्राचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत, असे माने यांनी सांगितले. ‘लोकमत’चे व्हाइस प्रेसिडेंट वसंत आवारे यांनी ‘लोकमत’ हा महाराष्टÑाचा मानबिंदू आहे, तसे येथील दुबईकरही महाराष्टÑाचे मानबिंदू असल्याचे सांगितले. एक लाख प्रतींच्या खपाचा विक्रम नोंदविणारे आणि त्याबद्दलचे प्रमाणपत्र राज्यपालांच्या हातून मिळालेला ‘लोकमत’चा ‘दीपोत्सव’ म्हणजे, महाराष्टÑाच्या शिरपेचातील मानाचा तुरा असल्याची भावनाही आवारे यांनी बोलून दाखविली.
व्हॅल्यूचे प्रोजेक्ट्स आणि बिझनेस डायरेक्टर व्ही. एम. राऊत, मोवार्ड एनर्जीचे ग्रुप फायनान्स को-आॅर्डिनेटर अजय भांगे, फेम्को इंटरनॅशनलचे प्रॉडक्ट मॅनेजर संदीप गुप्ता, अभी इंप्टेक इंटरनॅशनलचे सीईओ आणि मॅनेजिंग पार्टनर नितीन सास्तकर, महाराष्टÑ मंडळ दुबईचे अध्यक्ष राहुल गोखले, एसक्यूसीचे सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर तथा गल्फ महाराष्टÑ बिझनेस फर्मचे अध्यक्ष डॉ. सुनील मांजरेकर उपस्थित होते.
>दुबई येथे ‘लोकमत’ंच्या वतीने व्हा. प्रेसिडेंट वसंत आवारे आणि संपादक राजा माने यांनी महाराष्टÑ मंडळाचे संस्थापक तथा व्हॅल्यू मॅनेज कंपनीचे मॅनेजिंग डायेरक्टर महेश शुक्ल आणि दासबोध अभ्यास वर्गाचे प्रमुख डॉ.निमखेडकर यांचे स्वागत केले.