नोबेल विजेत्यांवर कौतुकाचा वर्षाव
By admin | Published: October 12, 2014 02:54 AM2014-10-12T02:54:35+5:302014-10-12T02:54:35+5:30
भारतीय बाल अधिकार कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी व पाकिस्तानी कार्यकर्ती मलाला युसूफझई यांना शांततेचे नोबेल मिळाल्याबद्दल संयुक्त राष्ट्राने दोघांचे कौतुक केले आहे.
Next
>संयुक्त राष्ट्र : भारतीय बाल अधिकार कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी व पाकिस्तानी कार्यकर्ती मलाला युसूफझई यांना शांततेचे नोबेल मिळाल्याबद्दल संयुक्त राष्ट्राने दोघांचे कौतुक केले आहे.
हा पुरस्कार बाल अधिकारांच्या संरक्षणासाठी अथक काम करणा:या या दोघांचा उचित गौरव करतो, असे युनोचे सरचिटणीस बान की मून आणि इतर संलग्न संघटनांनी म्हटले आहे.
सत्यार्थी आणि मलालाचे अभिनंदन करताना बान म्हणाले की, हे दोघे मुलांसाठी सर्वात मोठे चॅम्पियन असून त्यांच्या रूपाने जगभरातील वंचित मुलांचाच गौरव झाला आहे. युनोचे मानवाधिकार उच्चयुक्त जीद राड अल हुसैन यांनी जिनेव्हात सांगितले की, दोन्ही प्रमुख मानवाधिकार रक्षकांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाल्यामुळे बाल अधिकारांसाठी अथक काम करत असलेल्या जगातील कार्यकत्र्याचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. मलाला व कैलाश यांनी मोठय़ा अडचणींचा सामना करत एक अद्भुत साहस दाखवले आहे, असेही ते म्हणाले. कैलाश आणि मलाला यांना मिळालेल्या गौरवामुळे बाल अधिकार संरक्षणाच्या कार्याला चालना मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
आंतरराष्ट्रीय समुदायातर्फे साजरा करण्यात येत असलेल्या बाल अधिकार अधिवेशनाच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त बालकांच्या बहादूर विजेत्यांसाठी हा योग्य बहुमान असल्याचे युनिसेफने म्हटले आहे. 8क्च्या दशकापासून बालमजुरीविरुद्ध जागतिक आंदोलनाचे नेतृत्व करत आलेले कैलाश हे युनोचे मित्र आहेत, असे युनेस्कोचे महासंचालक इरीना बोकोवा यांनी म्हटले आहे.
ओबामांकडून अभिनंदन
वॉशिंग्टन : अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारतात बाल मजुरीविरुद्ध मोहीम राबविणारे कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानच्या मलाला युसूफझईचे शांततेचा नोबेल पटकावल्याबद्दल अभिनंदन केले आहे. (वृत्तसंस्था)
च्वॉशिंग्टन : कैलाश सत्यार्थी आणि मलाला युसूफझई यांची शांततेच्या नोबेलसाठी निवड झाल्याचे अमेरिकन संसद सदस्यांनी स्वागत केले आहे. या दोन्ही आशियाई प्रभृती मानवतेचे सर्वश्रेष्ठ प्रतिनिधित्व करतात व ते आशा आणि चिकाटीचे प्रतीक आहेत, असेही या संसद सदस्यांनी म्हटले आहे. सिनेट सदस्य रॉबर्ट मेनेंडेज म्हणाले की, मलाला आणि सत्यार्थी हेच शांततेच्या नोबेलसाठी पात्र आहेत. हिंसाचार आणि अराजकतेच्या या जगात या दोघांनी मानवतेचे सर्वश्रेष्ठ उदाहरण घालून दिले आहे. त्यांनी डोंगरासारखी आव्हाने आणि अडथळे पार केले आहेत.
च्ओटावा : शांततेचा नोबेल पटकावणारी पाकिस्तानी कार्यकर्ती मलाला युसूफजाईला कॅनडाने मानद नागरिकत्व देऊ केले असून ते स्वीकारण्यासाठी ती कॅनडाचा दौरा करणार असल्याचे पंतप्रधान स्टीफन हार्पर यांनी म्हटले आहे. मानद नागरिकत्वासाठी वर्षभरापूर्वीच मलालाचे नामांकन करण्यात आले होते. ती नागरिकत्व स्वीकारण्यासाठी 22 ऑक्टोबरला येथे येईल, असे हार्पर म्हणाले.