प्रज्वल देशात परत ये अन् शरण जा; देवेगौडा यांचे पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 06:07 AM2024-05-24T06:07:10+5:302024-05-24T06:08:10+5:30
प्रज्वल रेवण्णा याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात सक्त ताकीद देऊन देवेगौडा म्हणाले, त्याने आरोपांना सामोरे गेले पाहिजे. त्यासाठी त्याने जिथे कोठे असेल तेथून देशात परतले पाहिजे. मी हे आवाहन करीत नाही, तर सक्त ताकीद देतो आहे.
बंगळुरू : कथित सेक्स स्कॅण्डल प्रकरणातील आरोपी खासदार प्रज्वल रेवण्णा याने तातडीने भारतात यावे आणि पोलिसांना शरण जावे. कायद्यासमोर सर्व जण सारखे आहेत. आरोप सिद्ध झाल्यास त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे प्रतिपादन प्रज्वलचे आजोबा व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी गुरुवारी एका पत्राद्वारे केली.
प्रज्वल रेवण्णा याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात सक्त ताकीद देऊन देवेगौडा म्हणाले, त्याने आरोपांना सामोरे गेले पाहिजे. त्यासाठी त्याने जिथे कोठे असेल तेथून देशात परतले पाहिजे. मी हे आवाहन करीत नाही, तर सक्त ताकीद देतो आहे. त्याने जर माझ्या मताचा आणि सर्व कुटुंबीयांच्या इच्छेचा आदर केला नाही तर भडका उडेल. त्याला कोणीच मदत करणार नाही. या प्रकरणावर माझ्या खूपच तीव्र भावना आहेत, संताप आहे.
पासपोर्ट रद्द करण्यासाठी पत्र
दरम्यान, कर्नाटक सरकारने प्रज्वल रेवण्णा याचा राजनैतिक दर्जा असलेला पासपोर्ट रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.