३५ दिवसांनी प्रज्वल रेवन्ना मायदेशात; जर्मनीहून येताच एअरपोर्टवरच पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 08:17 AM2024-05-31T08:17:37+5:302024-05-31T08:19:01+5:30

Prajwal Revanna Arrest: एक व्हिडिओ संदेश जारी करत प्रज्वल रेवन्ना यांनी एसआयटीसमोर हजर राहून तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते.

prajwal revanna arrest cid police Bengaluru after landed in india from germany munich | ३५ दिवसांनी प्रज्वल रेवन्ना मायदेशात; जर्मनीहून येताच एअरपोर्टवरच पोलिसांनी केली अटक

३५ दिवसांनी प्रज्वल रेवन्ना मायदेशात; जर्मनीहून येताच एअरपोर्टवरच पोलिसांनी केली अटक

Prajwal Revanna Arrest: माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आणि कर्नाटकातील हसन मतदारसंघातील जेडीएसचे निलंबित नेता प्रज्वल रेवन्ना तब्बल ३५ दिवसांनी मायदेशात परत आले असून, एअरपोर्टवरच बंगळुरू पोलिसांनी रेवन्ना यांना अटक केली आहे. यानंतर आता त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. प्रज्वल रेवन्ना यांच्यावर अनेक महिलांनी लैंगिक छळ केल्याचे आरोप केले असून, दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गेल्या महिनाभरापासून प्रज्वल रेवन्ना जर्मनीमध्ये होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रज्वल रेवन्ना परदेशात फरार झाले. रेवन्नाविरोधात पोलिसांनी नोटीस जारी केल्यानंतर रेवन्ना यांचे बचावाचे सर्व मार्ग बंद झाले. गुरुवारी रात्री उशिरा रेवन्ना भारतात परतले आणि तत्काळ एअरपोर्टवरच अटक करण्यात आली.

पोलिसांच्या एका पथकाने प्रज्वल रेवन्ना यांना जीपमधून सीआयडी कार्यालयात नेले. त्यानंतर रात्रभर सीआयडी कार्यालयात ठेवण्यात आले. एसआयटी टीमने रेवन्ना यांच्या दोन सुटकेसही सोबत नेल्या आहेत. प्रज्वल रेवन्ना यांना शुक्रवारी वैद्यकीय चाचणीसाठी सरकारी रुग्णालयात नेण्यात येणार आहे. २४ तासांच्या आत न्यायालयात हजर केले जाणार आहे. यासोबतच फॉरेन्सिक टीम रेवन्ना यांचे ऑडिओ सॅम्पलही घेईल. व्हायरल व्हिडिओमध्ये येणारा आवाज प्रज्वल रेवन्ना यांचा आहे की नाही हे त्यातून समजेल, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला होता, ज्यामध्ये त्यांनी ३१ मे रोजी एसआयटीसमोर हजर राहून तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. सूत्रांनी सांगितले की, प्रज्वल रेवन्ना यांनी यापूर्वी दोनवेळा त्यांचे जर्मनीहून विमानाचे तिकीट रद्द केले होते.
 

Web Title: prajwal revanna arrest cid police Bengaluru after landed in india from germany munich

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.