प्रकाश जावडेकर कर्नाटकात भाजपाचे निवडणूक प्रमुख, अरुण जेटलींकडे गुजरातची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 03:41 AM2017-08-25T03:41:36+5:302017-08-25T03:42:41+5:30
कर्नाटकात या वर्षीच्या अखेरीस होत असलेल्या विधानसभा निवडणुकांची भाजपाची जबाबदारी मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
- हरीश गुप्ता ।
नवी दिल्ली : कर्नाटकात या वर्षीच्या अखेरीस होत असलेल्या विधानसभा निवडणुकांची भाजपाची जबाबदारी मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मणिपूर विधानसभा निवडणूक पक्षाला जिंकून दिल्याचे मोठे बक्षीस जावडेकर यांना या जबाबदारीतून दिले गेले आहे.
भाजपा नेतृत्वाने कोळसा, खाणी आणि वीजमंत्री पीयूष गोयल यांना कर्नाटकातच जावडेकर यांचे सहप्रमुख बनवण्यात आले आहे. कर्नाटकात सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या सरकारचा पाया बळकट असून, भाजपा मात्र अंतर्गत मतभेदांना तोंड देत आहे. त्यामुळे कर्नाटक हे भाजपासाठी मोठेच आव्हान आहे. पर्यायाने जावडेकर-गोयल यांनाही आव्हान कठीणच आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीची पक्षाची जबाबदारी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे दिली गेली असून चार मंत्र्यांनाही सहप्रमुख बनवण्यात आले. ग्रामीण आणि नागरी विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर, वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन, पंतप्रधान कार्यालयातील मंत्री जितेंद्र सिंह आणि कायदा राज्य मंत्री पी.सी. चौधरी हे जेटलींसोबत गुजरात विधानसभा निवडणुकीत काम करतील. जेटली चार वेळा गुजरातेतून राज्यसभेवर निवडून गेले आहेत.
हिमाचलची जबाबदारी गेहलोत यांच्याकडे
हिमाचल प्रदेशात भाजपाचे निवडणूक प्रमुख सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांना बनवण्यात आले आहे. हिमाचल प्रदेशात भाजपाचे निवडणूक प्रमुख सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांना बनवण्यात आले आहे.