प्रकाश जावडेकरांचा उद्या कम्युनिटी रेडिओवरून जनतेशी संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 02:13 AM2020-05-21T02:13:29+5:302020-05-21T02:14:11+5:30
देशभरातील कम्युनिटी रेडिओद्वारे ग्रामीण भागातील लोकांशी २२ मे रोजी सायंकाळी सात ते आठ या वेळेत संवाद साधणार आहेत.
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेडिओवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमाने प्रभावीत होऊन माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर हे रेडिओच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. ते देशभरातील कम्युनिटी रेडिओद्वारे ग्रामीण भागातील लोकांशी २२ मे रोजी सायंकाळी सात ते आठ या वेळेत संवाद साधणार आहेत. या संवादात जावडेकर कोरोना विषाणूबद्दल लोकांच्या असलेल्या शंका, सरकार करीत असलेली उपाययोजना आणि भविष्यातील योजनांवर चर्चा करतील.
वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गाव व खेड्यांतील चार ते पाच कोटी लोकांशी ते या कार्यक्रमाद्वारे जोडले जातील. प्रकाश जावडेकर हे लोकांना हे सांगतील की, कोरोनाला तोंड देण्यासाठी सरकारने काय तयारी केली आणि वेळेवर पाऊले उचलली गेली नसती तर किती नुकसान झाले असते.