Prakash Raj : "तुम्हाला प्रश्न विचारणाऱ्याने असं केलं असतं तर..."; प्रकाश राज यांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 12:01 PM2022-08-30T12:01:25+5:302022-08-30T12:14:45+5:30
Prakash Raj And BJP Amit Shah : अभिनेते प्रकाश राज यांनीही यावरुन भाजपावर टीका केली आहे. तसेच अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.
भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत (Asia Cup 2022) पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर रोमहर्षक विजयाची नोंद केली. भारताच्या या विजयाचे देशात सेलिब्रेशन करण्यात आले. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर भारताचा गजर घुमला... पण, BCCI सचिव जय शाह (Jay Shah) यांची एक कृती चर्चेचा विषय ठरली आहे. गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह हे आशियाई क्रिकेट संघटनेचे अध्यक्षही आहेत. तेही हा सामना पाहण्यासाठी उपस्थित होते आणि भारताच्या विजयानंतर ते पेव्हेलियनमध्ये उभे राहून टाळ्या वाजवू लागले. अशात त्यांच्या शेजारी असलेल्या व्यक्तीने त्यांना तिरंगा देऊ केला, परंतु जय शाह यांनी नकार दिला.
जय शाह यांचा हाच व्हिडीओ विरोधकांनी सोशल मीडियावर पोस्ट केला असून यावरून टीकेला सुरुवात केली आहे. नेटीझन्सनीही ट्रोलिंग सुरू केले. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करत ट्विट केलं आहे. "मेरे पास पापा हैं, तिरंगा अपने पास रखो!" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. याच दरम्यान आता अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनीही यावरुन भाजपावर टीका केली आहे. तसेच अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
Dear Supreme leader and Home Minister …#JayShah need not wave the INDIAN tricolour to prove his patriotism.. But … what would be the reaction of You and your Bjp BHAKTS .. if a Non BJP .. a Non Hindu or .. those who Question you like me ..had done this .. #justasking
— Prakash Raj (@prakashraaj) August 29, 2022
प्रकाश राज यांनी "प्रिय सर्वोच्च नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह… जय शाह यांनी त्यांची राष्ट्रभक्ती सिद्ध करण्यासाठी भारताचा तिरंगा हातात धरुन फडकवायला हवा हे गरजेचं नाही. पण जर कुणी नॉन भाजपा, नॉन हिंदू किंवा माझ्याप्रमाणेच तुम्हाला प्रश्न विचारणाऱ्या एखाद्या व्यक्तीने असं काही केलं असतं, तर त्यावर तुमची किंवा भाजपाच्या भक्तमंडळींची काय प्रतिक्रिया असती" असा सवाल केला आहे. त्यांच्या या ट्विटची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
"तिरंग्यापासून दूर राहण्याची यांची जुनी सवय"; जय शाह यांना टोला
काँग्रेसने जय शाह यांना लक्ष्य केलं आहे. "तिरंग्यापासून दूर राहण्याची यांची जुनी सवय आहे" असा टोला लगावला आहे. तेलंगणा राष्ट्र समितीनेही ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केली आहे. "हे कृत्य बिगर भाजपा नेत्याने केलं असतं, तर काय झालं असतं? भाजपाच्या आयटी विंगने त्या व्यक्तीला देशद्रोही म्हटलं असतं" असं ट्वीट टीआरएसचे सोशल मीडिया प्रमुख कृष्णन यांनी केलं आहे.
तिरंगे से दूरी की आदत इनकी कई पीढ़ियों पुरानी है- जाएगी कैसे? pic.twitter.com/UirAwmdWA7
— Congress (@INCIndia) August 29, 2022