नाचता येईना म्हणे अंगण वाकडे; प्रकाश राज यांचा भाजपावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 06:00 PM2019-11-27T18:00:22+5:302019-11-27T18:14:37+5:30
उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येत 'महाराष्ट्र विकास आघाडी'चे सरकार स्थापन करणार आहेत. त्यामुळे राज्यातील सत्ता संघर्षाचा पेच जवळपास सुटल्यातच जमा आहे. उद्या 'महाराष्ट्र विकास आघाडी'चे नेते म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने भाजपाला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर भाजपाकडे बहुमत नसल्याची कबुली देत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्यातील अवघ्या साडेतीन दिवसाचे 'देवेंद्र सरकार-2' कोसळले.
गेल्या चार दिवसांत घडलेल्या राजकीय घडामोडींवर सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. यात सोशल मीडियात सुद्धा अग्रेसर आहे. विशेष म्हणजे, दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी सोशल मीडियात राज्यातील राजकीय घडामोडींवर ट्विट करून भाजपावर निशाणा साधला आहे.
#MahaShame ..eventually DANCERS who can’t dance QUIT ..BLAMING the floor .. ಮಹಾ ನಾಟಕ ... ಕೊನೇಗೂ...ಕುಣಿಯೋಕ್ ಆಗದವರು ನೆಲ ಡೊಂಕೆಂದರು.. ನಾಚಿಕೆ ಆಗಲ್ವೆ ....#JustAsking
— Prakash Raj (@prakashraaj) November 26, 2019
प्रकाश राज यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये ‘#MahaShame ज्यांना नाचता येत नाही ते डान्स फ्लोअरला नावे ठेवत नाचणे बंद करतात’ (नाचता येईना पण अंगण वाकडे) असे म्हणत प्रकाश राज यांनी भाजपाला टोला लगावला आहे. तसेच, याआधी त्यांनी सतत महाराष्ट्राच्या राजकारणावर ट्विट केले आहेत.
दरम्यान, मुंबईतील शिवाजी पार्कवर उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला राज्यातील शेतकऱ्यांसह अनेक नेतेमंडळी उपस्थित राहणार आहे.