प्रणव मुखर्जींनी थरुर प्रकरणाचा बदला घेतला - ललित मोदी

By Admin | Published: June 19, 2015 09:32 AM2015-06-19T09:32:14+5:302015-06-19T09:44:32+5:30

शशी थरुर प्रकरणाचा बदला घेण्यासाठी तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सक्तवसुली संचलनालयाला आयपीएल व माझ्या आर्थिक व्यवहारांच्या चौकशीचे आदेश दिले असा गंभीर आरोप ललित मोदी यांनी केला आहे.

Pranab Mukherjee took revenge for Tharu's case - Lalit Modi | प्रणव मुखर्जींनी थरुर प्रकरणाचा बदला घेतला - ललित मोदी

प्रणव मुखर्जींनी थरुर प्रकरणाचा बदला घेतला - ललित मोदी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १९ - शशी थरुर प्रकरणाचा बदला घेण्यासाठी तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सक्तवसुली संचलनालयाला आयपीएल व माझ्या आर्थिक व्यवहारांच्या चौकशीचे आदेश दिले असा गंभीर आरोप ललित मोदी यांनी केला आहे. 

ललित मोदी यांनी ब्रिटनकडे दिलेल्या ४६ पानी पत्रात त्यांनी यूपीए सरकारवर आरोप केले होते. एका इंंग्रजी वृत्तपत्राने शुक्रवारी या पत्रातील तपशील उघड केला. यात ललित मोदी म्हणतात,आयपीएलमधील कोच्ची संघात सुनंदा पुष्कर यांची मालकी असल्याचे मी उघड केल्यापासून काँग्रेसमध्ये माझ्याविरोधात राग होता. माझ्या खुलाश्यानंतर सुरुवातीला काँग्रेसने शशी थरुर यांची पाठराखण केली. मात्र काही दिवसांनी विरोधकांकडून दबाव वाढल्याने काँग्रेसला शशी थरुर यांच्याकडून राजीनामा घ्यावा लागला होता.  तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आयपीएल गैरव्यवहार व माझ्या आर्थिक व्यवहारांच्या चौकशीचे आदेश दिले होते असा आरोप त्यांनी केला आहे. 

Web Title: Pranab Mukherjee took revenge for Tharu's case - Lalit Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.