प्रणव मुखर्जी यांची प्रकृती नाजूक, अफवांवर विश्वास ठेवू नका; मुलीचं कळकळीचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 09:37 AM2020-08-13T09:37:50+5:302020-08-13T09:50:12+5:30
प्रणव मुखर्जीं यांच्या मेंदूवर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यादरम्यान, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते.
नवी दिल्ली - देशाचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी यांची नाजूक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल जी अफवा आहे, त्यावर कुणीही विश्वास ठेऊ नये, असे ट्विट प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी केलंय. सध्या मी रुग्णलयातच असून तेथील कामकामाजासाठी मला माझा फोन फ्री ठेवायचा आहे. त्यामुळे, कृपया मला कुणीही फोन करु नये, असे शर्मिष्ठा यांनी म्हटलं आहे.
प्रणव मुखर्जीं यांच्या मेंदूवर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यादरम्यान, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. दरम्यान, आज सकाळी त्यांच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियातून व्हायरल झाले. मात्र, ही अफवा असून कोणीही त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत कळकळीची विनंतीही कन्या शर्मिष्ठा यांनी केलीय.
Rumours about my father is false. Request, esp’ly to media, NOT to call me as I need to keep my phone free for any updates from the hospital🙏
— Sharmistha Mukherjee (@Sharmistha_GK) August 13, 2020
प्रणव मुखर्जी यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू असून ते सध्या व्हेंटीलेटरवर आहेत. डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहे.
The condition of former President Pranab Mukherjee remains unchanged this morning. He is deeply comatose with stable vital parameters and continues to be on ventilatory support: Army Research & Referral (R&R) Hospital, Delhi https://t.co/JPhaOOoEvL
— ANI (@ANI) August 13, 2020