प्रणव रॉय दाम्पत्याला विदेशात जाण्यापासून मुंबई विमानतळावर रोखले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 03:24 AM2019-08-10T03:24:48+5:302019-08-10T03:25:19+5:30

केंद्रीय गुप्तचर खात्याच्या निर्देशानुसार कारवाई

Pranab Roy barred the couple from traveling to Mumbai airport | प्रणव रॉय दाम्पत्याला विदेशात जाण्यापासून मुंबई विमानतळावर रोखले

प्रणव रॉय दाम्पत्याला विदेशात जाण्यापासून मुंबई विमानतळावर रोखले

Next

मुंबई : विदेशात जाण्याच्या तयारीत असलेले एनडीटीव्हीचे संस्थापक प्रणव रॉय व राधिका रॉय या दाम्पत्याला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी रोखण्यात आले व त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या खटल्यामध्ये चौकशी सुरू असल्याने केंद्रीय गुप्तचर खात्याच्या (सीबीआय) निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिली. तर बनावट व काहीच तथ्य नसलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा गैरवापर करून रॉय यांना रोखण्यात आल्याचा दावा एनडीटीव्हीतर्फे करण्यात आला. रॉय दाम्पत्य नैरोबीला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

रॉय दाम्पत्य विदेशात जाऊन १६ ऑगस्टला देशात परतणार होते, मात्र सीबीआयने २ वर्षांपूर्वी दाखल केलेल्या खोट्या व तथ्यहीन प्रकरणी त्यांना रोखण्यात आले. ही कारवाई माध्यमांवर अंकुश लावणारी असून इतर माध्यमांना इशारा आहे, असे कंपनीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मूलभूत अधिकारांवर करण्यात आलेले हे आक्रमण आहे. याबाबत मुंबई विमानतळाच्या प्रवक्त्याने अद्याप काहीही अधिकृत माहिती दिलेली नाही. लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अशा प्रकारे होणाºया हल्ल्यांमुळे आम्ही काहीही झज्ञले तरीही डगमगून जाणार नसल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. एका खासगी बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात सीबीआय चौकशी करत आहे. मात्र रॉय यांना जाणीवपूर्वक या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा दावा त्यांच्यातर्फे करण्यात आला आहे.

Web Title: Pranab Roy barred the couple from traveling to Mumbai airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.