झुवारीनगर येथे प्रॅनिक हिलिं

By Admin | Published: December 3, 2015 03:30 AM2015-12-03T03:30:59+5:302015-12-03T03:30:59+5:30

झुवारीनगर येथे प्रॅनिक हिलिंग शिबिर संपन्न

Pranik Hilin at Jhuwarinagar | झुवारीनगर येथे प्रॅनिक हिलिं

झुवारीनगर येथे प्रॅनिक हिलिं

googlenewsNext
वारीनगर येथे प्रॅनिक हिलिंग शिबिर संपन्न

वास्को :झुवारीनगर येथील विद्यानगर रहिवाशी कल्याण संघटनेतर्फे जीएमसीकेएस - प्रॅनिक हिलिंग व अरहॅटिक योगा असोसिएशनच्या सहकार्याने झुआरीनगर येथील एअरवे एज्यूकेशन सोसायटीच्या आवारात प्रॅनिक हिलींग शिबिराचे आयोजन करण्यात आल़े
संघटनेच्या सुमारे 50 सदस्यांनी शिबिराचा लाभ घेतला़ शिबिरात सहभागी संघटनेच्या सदस्यानी ध्यान व योगा केला़ प्रॅनिक उपचार पध्दती ही साधी व प्रभावी उपचार प्रणाली आह़े यात औषधांची गरज नाही़ ही उपचार पध्दती शारिरिक, भावनिक व मानसिक पातळीवर उपचार करत़े
संघटनेचे अध्यक्ष एडवर्ड फ र्नांडिस यांनी स्वागत करून प्रॅनिक उपचार पध्दतीचे महत्व विशद केल़े या उपचार पध्दतीमुळे मधुमेह रक्तदाबावर नियंत्रण मिळते, तसेच मनशांती व आनंद प्राप्त होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी संगितल़े
कोमल परूळेकर यानीही प्रॅनिक उपचार पध्दतीचे महत्व सांगून प्रत्येकाने याचा उपयोग करावा असे आवाहन केल़े व्यसन, धूम्रपान, दारू, नैराश्य, तणाव मुक्त करण्यासाठी प्रॅनिक उपचार पध्दतीचा फ ायदा होत असल्याचे त्या म्हणाल्या़
यावेळी जीएसीकेएस प्रॅनिक हिलिंग व अरहॅटिक योगा असोसिएशनचे सदस्य तसेच वर्षा नाईक, पौर्णिमा, गीता, स्वप्नील रेवणकर, योगेशश गरूड, मिलिंग चौधरी, सुरेंद्र नाईक व तनुज कुमार आदी मान्यवर उपस्थित होत़े गणेश लमाणी यानी उपस्थित मान्यवरांचे आभार मानल़े

(वार्ताहर)


Web Title: Pranik Hilin at Jhuwarinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.