प्राणप्रतिष्ठा व अमृतकाळाचा प्रारंभ हा योगायोग नव्हे - शाह
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 08:45 AM2023-12-31T08:45:17+5:302023-12-31T08:45:41+5:30
शाह म्हणाले की, या वादाबाबतचे खटले अधिक गुंतागुंतीचे झाले व प्रलंबित राहिले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर व संतमहंतांच्या आशीर्वादाने मार्ग सुरळीत होत गेला.
अहमदाबाद : अयोध्येत भगवान राम यांच्या मंदिरात २२ जानेवारी रोजी होत असलेला प्रतिष्ठापना सोहळा, तसेच देशात सुरू झालेला अमृतकाळ हा निव्वळ योगायोग नसून, येत्या २५ वर्षांत भारत जागतिक पटलावर नावारूपाला येईल, याचे ते द्योतक आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.
अहमदाबाद येथे स्वामीनारायण गुरुकुल विश्वविद्या प्रतिष्ठानम् या संस्थेने आयोजिलेल्या श्री पुरानी स्वामी स्मृती महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी अमित शाह यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले की, अयोध्येत जिथे भगवान राम यांचा जन्म झाला होता त्या पवित्र ठिकाणी असलेले मंदिर ५५० वर्षांपूर्वी उद्ध्वस्त करण्यात आले. त्याठिकाणी पुन्हा मंदिर बांधणे शक्य होत नव्हते. त्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना यश येत नव्हते.