सरन्यायाधीश दीपक मिश्रांविरोधात ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 08:24 PM2018-01-16T20:24:33+5:302018-01-16T20:34:47+5:30
गेल्या काही दिवसांपासून सुप्रीम कोर्टातील घडामोडी चर्चेत आहेत. आता ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात तक्रार केली आहे.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सुप्रीम कोर्टातील घडामोडी चर्चेत आहेत. आता ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात तक्रार केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींना लिखित स्वरूपात त्यांनी तक्रार केली आहे.
प्रशांत भूषण यांनी यासंबंधी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पाच न्यायमूर्तींमध्ये 12 जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणा-या चार न्यायाधीशांचाही समावेश आहे. तक्रारीत सरन्यायाधीश दिपक मिश्रांच्या विरोधात चार मुख्य आरोप असल्याचं भूषण म्हणाले. जस्टिस चेलमेश्वर, जस्टिस गोगोई, जस्टिस जोसेफ, जस्टिस एम बी लोकुर आणि जस्टिस ए के सीकरी यांना लिखित तक्रार देण्यात आली आहे.
काय आहे तक्रार -
- मेडिकल कॉलेज घोटाळ्याप्रकरणी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात ही तक्रार दाखल केली आहे.
- न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर यांनी या कथित घोटाळ्याची सुनावणी करण्यासाठी एक संवैधानिक खंडपीठ स्थापन करण्याचा आदेश दिला होता.
- मात्र, नोव्हेंबरमध्ये सरन्यायाधीश मिश्रा यांनी हा आदेश बदलला होता.
- हाच मुद्दा पुढे करत भूषण आणि बेजबाबदारपणा आणि अनियमिततेचे आरोप करत न्या. मिश्रा यांच्या चौकशीची मागणी केली आहे.
- प्रसाद एज्युकेशन ट्रस्टच्या मेडिकल कॉलेजसाठीच्या मान्यतेबाबतचं हे प्रकरण असून सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.