श्रीकृष्णाबाबत केलेल्या "त्या" ट्विटवर प्रशांत भूषण यांची माफी

By admin | Published: April 4, 2017 04:01 PM2017-04-04T16:01:40+5:302017-04-04T16:01:40+5:30

प्रशांत भूषण यांनी शेक्सपिअरच्या नाटकातील पात्र रोमियो आणि भगवान श्रीकृष्णाची तुलना केली होती.

Prashant Bhushan's apologies for "That" tweet about Shrikrushna | श्रीकृष्णाबाबत केलेल्या "त्या" ट्विटवर प्रशांत भूषण यांची माफी

श्रीकृष्णाबाबत केलेल्या "त्या" ट्विटवर प्रशांत भूषण यांची माफी

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टवाळखोरांना आळा घालण्यासाठी स्थापन केलेल्या एंटी रोमियो स्क्वॉडवरून ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी  वादग्रस्त ट्विट केलं होतं. त्यावरून प्रचंड गदारोळ झाल्यानंतर प्रशांत भूषण यांनी माफी मागितली आहे.
 
माझ्या ट्विटला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं. हेतू नसताना माझ्या ट्विटमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या. यासाठी मी माफी मागतो असे ट्विट करत प्रशांत भूषण यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
रोमियोने केवळ एका महिलेवर प्रेम केलं होतं तर कृष्ण छेडछाड करण्यासाठी प्रसीद्ध होता. आदित्यनाथ यांच्यात एंटी रोमियो स्क्वॉडचं नाव बदलून एंटी कृष्ण स्क्वॉड  करण्याची हिम्मत आहे का असं ट्विट भूषण यांनी केलं होतं.  
 
प्रशांत भूषण यांनी शेक्सपिअरच्या नाटकातील पात्र रोमियो आणि भगवान श्रीकृष्णाची तुलना केली होती.  रोमियोने केवळ एका महिलेवर प्रेम केलं होतं तर कृष्ण छेडछाड करण्यासाठी प्रसीद्ध होता. आदित्यनाथ यांच्यात एंटी रोमियो स्क्वॉडचं नाव बदलून एंटी कृष्ण स्क्वॉड  करण्याची हिम्मत आहे का असं ट्विट भूषण यांनी केलं होतं.
 
 कोट्यावधी लोकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीकृष्णाची तुलना शेक्सपिअरच्या नाटकातील रोमियोसोबत केल्यानंतर मोठा वाद उफाळला होता.  प्रकरण चिघळण्याची चिन्हे दिसताच मंगळवारी प्रशांत भूषण यांनी ट्विटरवरुन माफी मागितली. अँटी रोमियो पथक आणि कृष्णबद्दलच्या माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ निघाला. यामुळे अनावधानाने अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. यासाठी मी सर्वांची माफी मागतो आणि ते ट्विट डिलीट करतो असे प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे.

Web Title: Prashant Bhushan's apologies for "That" tweet about Shrikrushna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.