Prashant Kishor: "देशात 80-82 टक्के हिंदू, पण भाजपला फक्त 40 टक्के लोक मतदान करतात"- प्रशांत किशोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 10:46 AM2022-05-12T10:46:01+5:302022-05-12T11:08:28+5:30

Prashant Kishor on Polarisation: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी देशातील ध्रुवीकरणाच्या राजकारणावर अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. कोणत्याही पक्षाच्या जय-पराजयाकडे संपूर्ण ध्रुवीकरणाच्या दृष्टिकोनातून पाहणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.

Prashant Kishor: 80-82 percent Hindus in the country, but only 40 percent votes for BJP- Prashant Kishor | Prashant Kishor: "देशात 80-82 टक्के हिंदू, पण भाजपला फक्त 40 टक्के लोक मतदान करतात"- प्रशांत किशोर

Prashant Kishor: "देशात 80-82 टक्के हिंदू, पण भाजपला फक्त 40 टक्के लोक मतदान करतात"- प्रशांत किशोर

googlenewsNext

नवी दिल्ली: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी देशातील हिंदू आणि भाजपला मिळणाऱ्या मतदानावर मोठे वक्तव्य केले आहे. इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राच्या एका कार्यक्रमात बोलताना किशोर म्हणाले की, "देशात 80 ते 82 टक्के लोकसंख्या हिंदू आहेत, पण तरीही भाजपला फक्त 40 टक्के मते मिळतात. अशा परिस्थितीत भाजप ध्रुवीकरणाच्या जोरावर निवडणुका जिंकतो असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे," असे ते म्हणाले.

देशाच्या राजकारणात कथितरित्या वाढत्या ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते पुढे म्हणाले की, "देशात ध्रुवीकरणाची बाब अतिशय अतिशयोक्त पद्धतीने मांडली जात आहे. आता ध्रुवीकरणाची पद्धत बदलली आहे. 15 वर्षांपूर्वी तु्म्ही कसे ध्रुवीकरण करायचा, ते आता बदलले आहे. पण, त्याचा प्रभाव जवळजवळ समान आहे. आम्ही निवडणुकीच्या आकडेवारीचा अभ्यास केला आहे. या आधारावर आपण असे म्हणू शकतो की, ज्या निवडणुकीत सर्वाधिक ध्रुवीकरण होते, असे म्हटले जाते, त्यातही कोणत्याही पक्षाला कोणत्याही एका समाजाच्या 50-55 टक्के मतदारांची जमवाजमव करता येत नाही. ध्रुवीकरणाला निवडणूक हरण्याचे कारण सांगणारे चुकीचे आहेत, असा त्यांचा अर्थ आहे," असेही ते पुढे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, "समजा तुम्ही हिंदू समाजाचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केलात. हा समाज देशात बहुसंख्य आहे. जर हिंदू समाजातील ध्रुवीकरणाची पातळी 50 टक्क्यांवर पोहोचली, म्हणजे त्यातील 50 टक्के लोक एकाच पक्षाला मत देतात कारण ते त्या पक्षाच्या प्रभावाखाली असतात. पण इथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा आहे की, ध्रुवीकरणाने प्रभावित झालेल्या प्रत्येक हिंदूसोबत दुसरा हिंदू आहे ज्याला त्याचा फटका बसत नाही. हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण निर्णायक आहे असे मानणे. यामुळे निवडणूक जिंकता येते किंवा हरता येते…असे मानणे चुकीचे आहे."

किशोर पुढे म्हणाले की, "जेव्हा ते बाहेर पडतात तेव्हा त्यांना असे अनेक लोक भेटतात जे म्हणतात की सर्व हिंदूंचे ध्रुवीकरण झाले आहे. पण वस्तुस्थिती काही औरच सांगते. भारतात भाजपला 38 टक्के मते मिळाली आहेत. एक मिनिट कल्पना करा आणि सांगा की हे सर्व मतदार हिंदुत्वाच्या प्रभावाने भाजपला मतदान करतात का? भाजपला मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या देशातील एकूण हिंदूंच्या निम्म्याहून कमी आहे." नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश निवडणुकांचाही त्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले की, "या राज्यात भाजपला 40 टक्के मते मिळाली आहेत. तर राज्यात हिंदू लोकसंख्या 80-82 टक्के आहे. याचा अर्थ निम्म्याहून कमी हिंदूंनी भाजपला मतदान केले. येथे आपण असे म्हणू शकतो की ध्रुवीकरणाचा परिणाम होतो पण केवळ ध्रुवीकरणाच्या जोरावर एखादा पक्ष निवडणुका जिंकतो किंवा हरतो असे म्हणता येणार नाही."

Web Title: Prashant Kishor: 80-82 percent Hindus in the country, but only 40 percent votes for BJP- Prashant Kishor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.