प्रशांत किशोर यांची बिहार पदयात्रा सुरू; राजकारणातील प्रवेशाची नांदी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 06:02 AM2022-10-03T06:02:55+5:302022-10-03T06:03:33+5:30

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी ३,५०० कि.मी.च्या पदयात्रेला गांधी जयंतीचे औचित्य साधून गांधी आश्रमातून प्रारंभ केला. 

prashant kishor bihar padayatra begins an entry into politics | प्रशांत किशोर यांची बिहार पदयात्रा सुरू; राजकारणातील प्रवेशाची नांदी!

प्रशांत किशोर यांची बिहार पदयात्रा सुरू; राजकारणातील प्रवेशाची नांदी!

Next

विभाष झा, लोकमत न्यूज नेटवर्क

भितिहरवा (बिहार) : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी ३,५०० कि.मी.च्या पदयात्रेला गांधी जयंतीचे औचित्य साधून रविवारी येथील गांधी आश्रमातून प्रारंभ केला. 

त्यांच्या राजकारणातील प्रवेशाची नांदी म्हणून याकडे पाहिले जात आहे. पदयात्रेदरम्यान ते प्रत्येक पंचायतीला भेट देण्याचा प्रयत्न करणार असून, ही यात्रा पूर्ण होण्यास १२ ते १५ महिने लागतील. बिहारचा कायापालट करण्यासाठी त्यांनी मे महिन्यात ‘जन सुराज’ या अभियानाची घोषणा केली होती. पदयात्रा त्याच एक भाग आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: prashant kishor bihar padayatra begins an entry into politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.