पर्वा नाही तर 'सीएए-एनआरसी'ची क्रोनॉलॉजी लागू करा, अमित शाहांना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 01:35 PM2020-01-22T13:35:04+5:302020-01-22T13:36:51+5:30
केंद्र सरकार सीएए लागू करण्यासाठी मागे हटणार नाही. याला विरोध करणाऱ्यांची पर्वा करणार नाही, असे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले होते.
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरूस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. यातच, सीएए आणि एनआरसीला जनता दल युनायटेडचे (जेडीयू) उपाध्यक्ष प्रशांत किशोर हे सतत विरोध करताना दिसत आहेत. यावरून प्रशांत किशोर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. जर या कायद्याला होणाऱ्या विरोधाची पर्वा नाही. तर तुम्ही सीएए आणि एनआरसी लागू करण्यासाठी पुढाकार का घेत नाही, असा सवाल प्रशांत किशोर यांनी केला आहे.
केंद्र सरकार सीएए लागू करण्यासाठी मागे हटणार नाही. याला विरोध करणाऱ्यांची पर्वा करणार नाही, असे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले होते. या वक्तव्यावरून प्रशांत किशोर यांनी ट्विटरच्या माध्यमातून अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, "नागरिकांचे मतभेत फेटाळून लावणे, हे कोणत्याही सरकारच्या ताकदीचे संकेत असून शकत नाहीत. तुम्ही (अमित शाह) सीएए आणि एनआरसीला विरोध करणाऱ्यांची पर्वा करत नाही. तर हा कायदा लागू करण्यास पुढाकार का घेत नाही? तुम्ही देशासाठी मोठा निर्णय घेतला आहे, त्याच क्रोनॉलॉजीमध्ये सीएए आणि एनआरसीला लागू करण्याचा प्रयत्न करा."
मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लखनौ येथे सीएएच्या समर्थनात घेतलेल्या सभेत हा कायदा कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नसल्याचे विरोधकांना खडसावून सांगितले. तसेच, अमित शाह यांनी समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, काँग्रेस, तृणमूल काँग्रेसच्या यांच्यावरही शरसंधान केले. ‘सीएए’वरून होणाऱ्या हिंसाचाराला हे पक्षच जबाबदार आहेत असा आरोप त्यांनी केला होता. दरम्यान, सीएए आणि एनआरसीच्या विरोधात ठिकठिकाणी विरोधी पक्षांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाकडून सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
पुण्यातील प्रसिद्ध 'येवले चहा'मध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, FDAच्या अहवालातून उघड
...तर काँग्रेसकडे सरकार स्थापनेचा प्रस्ताव घेऊन जाण्याचा प्रश्नच नव्हता - शिवसेना
ई-तिकिटाच्या काळाबाजारातून दहशतवाद्यांना निधी पुरवल्याचा संशय; RPFचा पर्दाफाश
बोलायचे एक व करायचे दुसरेच, भाजपाने स्वतःचा खरा चेहरा आरशात पाहावा; शिवसेनेचा टोला
उद्धवा, अजब तुझे सरकार म्हणत मनसे नेत्याने ठाकरे सरकारच्या 'या' निर्णयाची उडवली खिल्ली