'इंडिया आघाडीचे पुढे काही होऊ शकत नाही', प्रशांत किशोर यांची विरोधकांवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 07:29 PM2024-01-24T19:29:48+5:302024-01-24T19:30:38+5:30

ममता बॅनर्जी यांनी राज्यात स्वबळाचा नारा दिल्यामुळे INDIA आघाडीबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

Prashant Kishor Gave Statement On Mamata Banerjee And India Alliance and LokSabha Election | 'इंडिया आघाडीचे पुढे काही होऊ शकत नाही', प्रशांत किशोर यांची विरोधकांवर बोचरी टीका

'इंडिया आघाडीचे पुढे काही होऊ शकत नाही', प्रशांत किशोर यांची विरोधकांवर बोचरी टीका

Prashant Kishor on India Alliance: सत्ताधारी भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीत फूट पडल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात स्वबळाचा नारा देत इंडिया आघाडीला मोठा धक्का दिला आहे. या निर्णयावर आता निवडणूक रणनितीकार आणि 'जन सूराज'चे संस्थापक प्रशांत किशोर यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. 

आघाडीचे पुढे काहीही होणार नाही
मीडियाशी संवाद साधताना प्रशांत किशोर म्हणाले की, मी गेल्या 6-7 महिन्यांपासून सांगतोय. ज्याला तुम्ही इंडिया आघाडी म्हणता, त्यात बसलेले सर्व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, स्टॅलिन, उद्धव ठाकरे, या सर्वांना मुख्यमंत्री बनवण्याचे अभियान मी सुरू केले होते. त्यांच्या विजयात माझा मोठा वाटा आहे, मी त्या सर्व लोकांना खुप चांगलं ओळखतो. त्यामुळेच मी म्हणत आलोय की, या इंडिया आघाडीचे पुढे काहीही होणार नाही. हे सर्वजण आपापले राज्य वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

इंडिया आघाडीत समानता नाही
पीके पुढे म्हणाले की, इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये एकसूत्रता नाही, एकमेकांना मदत करण्याची इछा नाही. या आघाडीतून काहीही साध्य होणार नाही. तुम्ही बंगालबद्दल बोलता, बिहारमध्ये आघाडी झाली का, हे आधी सांगा. ज्या राज्यात इंडिया आघाडीची सुरुवात झाली, त्या राज्यात नितीश कुमार आघाडीबाबत स्पष्टपणे बोलू शकत नाहीत. 

एनडीएबाबत म्हणाले...
एनडीएबाबत प्रशांत किशोर यांना विचारले असता ते म्हणाले की, एनडीएमध्ये सर्व काही एका व्यक्तीच्या नावावर आहे. ते व्यक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. ते जे काही सांगतात, तेच होते. त्यांच्यापुढे ज्या इंडिया आघाडीची कल्पना केली जात आहे, त्याची पहिली बैठक बिहारच्या पाटणा येथे झाली. त्यानंतर सर्वप्रथम बिहारमधील जागावाटप जाहीर व्हायला हवे होते, पण तसे आजपर्यंत झालेले नाही, असंही पीके यावेळी म्हणाले.

Web Title: Prashant Kishor Gave Statement On Mamata Banerjee And India Alliance and LokSabha Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.